23 November 2024 12:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Integra Essentia Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! कंपनी प्रचंड चर्चेत, स्वस्त शेअर खरेदी करणार?

Integra Essentia Share Price

Integra Essentia Share Price| इंटेग्रा एसेन्शिया या कंपनीचे शेअर्स सध्या राइट्स इश्यूमुळे चर्चेत आले आहेत. दिग्गज सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची गुंतवणूक असलेल्या इंटेग्रा एसेन्शिया कंपनीने 50 कोटी निधी उभारण्यासाठी राइट्स इश्यू जाहीर केला आहे. ( इंटेग्रा एसेन्शिया कंपनी अंश )

इंटेग्रा एसेन्शिया कंपनीच्या संचालक मंडळाने राइट इश्यू किंमत 3.25 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. ही किंमत शेअर्सच्या सध्याच्या किमतीपेक्षा 15 टक्के कमी आहे. इंटेग्रा एसेन्शिया कंपनीचा राइट्स इश्यू 11 जून ते 25 जून 2024 दरम्यान खुला केला जाईल.

बुधवारी इंटेग्रा एसेन्शिया कंपनीचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 3.72 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरूवार दिनांक 30 मे 2024 रोजी इंटेग्रा एसेन्शिया स्टॉक 1.33 टक्के घसरणीसह 3.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

LIC कंपनीने इंटेग्रा एसेन्शिया कंपनीचे 97,19,832 शेअर्स होल्ड केले आहेत. हे प्रमाण कंपनीच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या 1.08 टक्के आहे. इंटेग्रा एसेन्शिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 7.83 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.55 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 346.43 कोटी रुपये आहे.

इंटेग्रा एसेन्शिया कंपनीने राइट्स इश्यूची रेकॉर्ड डेट म्हणून 1 जून 2024 हा दिवस निश्चित केला आहे. इंटिग्रा एसेन्शिया कंपनीने राइट्स इश्यूचे प्रमाण 20 : 119 निश्चित केले आहे. म्हणजेच ही आपल्या गुंतवणूकदारांना 119 शेअरवर 20 इक्विटी शेअर्स खरेदी करण्याचे राइट्स देणार आहे. इंटेग्रा एसेन्शिया कंपनीच्या राइट्स इश्यूचा आकार 50 कोटींपेक्षा जास्त आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Integra Essentia Share Price BSE Live 30 May 2024.

हॅशटॅग्स

#Integra Essentia Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x