27 November 2024 5:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

HDFC Mutual Fund | पैशाने पैसा वाढवा! नोट छापायची मशीन आहे ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स जाणून घ्या

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंडांकडे गुंतवणूकदारांचा कल सातत्याने वाढत आहे. एसआयपी दर महिन्याला नवे विक्रम रचत आहे. सध्या बाजार उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या मदतीने इक्विटी फंडात गुंतवणूक करा.

गुंतवणुकीचा दृष्टीकोन दीर्घ असावा, कारण अल्पावधीत यामुळे तुमचे नुकसानही होऊ शकते, असा सल्ला आर्थिक तज्ज्ञ देतात. यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान निफ्टी 50 मध्ये सुमारे 5.8 टक्क्यांची सुधारणा दिसून आली.

एप्रिलपासून त्यात सुमारे 6.7 टक्के वाढ झाली आहे. निव्वळ आधारावर या वर्षी आतापर्यंत निफ्टीजवळपास 1 टक्क्यांनी वधारला आहे. ही अस्थिरता टाळण्यासाठी दीर्घ मुदतीसाठी एसआयपी करणे आवश्यक आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी इक्विटी श्रेणीतील गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडाच्या टॉप शिफारशी केल्या आहेत. या फंडांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

1. कोटक इमर्जिंग इक्विटी फंड
2. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इक्विटी अँड डेट फंड
3. एचडीएफसी स्मॉल कॅप फंड
4. मिरे अॅसेट लार्ज कॅप फंड

HDFC Small Cap Fund
वरील फंडांमध्ये एचडीएफसी स्मॉल कॅप फंडाने तीन वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक परतावा दिला आहे. 1 जूनरोजी याची एनएव्ही 90 रुपयांच्या आसपास आहे. निधीचा आकार 15857 कोटी रुपये आहे. तीन वर्षांच्या कालावधीत या फंडाने सरासरी 45.74 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. निव्वळ आधारावर 210 टक्के परतावा दिला आहे. तीन वर्षांत एसआयपी गुंतवणूकदारांना सरासरी 30.54 टक्के परतावा दिला आहे. निव्वळ परतावा सुमारे 55 टक्के आहे.

तीन वर्षांत पैसे तिप्पट
या फंडातील गुंतवणूकदाराने तीन वर्षांपूर्वी 10000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती तर आज त्याचे मूल्य 5.6 लाख रुपयांच्या जवळपास असेल. गुंतवणुकीची एकूण रक्कम 3.6 लाख रुपये झाली असती. हेच 3.6 लाख रुपये तीन वर्षांपूर्वी जमा झाले असते तर आज त्याची किंमत 11.15 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असती. म्हणजेच एकरकमी गुंतवणुकदारांना तिप्पट परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : HDFC Small Cap Fund NAV Today 31 May 2024.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x