22 November 2024 3:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Rattan Power Share Price | श्रीमंत करणार 19 रुपयाचा शेअर, 1 महिन्यात दिला 100% परतावा, जोरदार खरेदी सुरु

Rattan Power Share Price

Rattan Power Share Price | रतन इंडिया पॉवर कंपनीचे शेअर्स मागील अनेक ट्रेडिंग सेशनपासून तेजीत वाढत आहेत. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 18.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )

मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 21 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 टक्केपेक्षा जास्त वाढली आहे. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी रतन इंडिया पॉवर स्टॉक 4.93 टक्के वाढीसह 19.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

2 मे 2024 रोजी रतन इंडिया पॉवर कंपनीचे शेअर्स 9 रुपये किमतींवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने मार्च तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ही कंपनी तोट्यात होती. मार्च 2024 मध्ये संपलेल्या तिमाहीत रतन इंडिया पॉवर कंपनीने 10.665.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी मार्च तिमाहीत रतन इंडिया पॉवर कंपनीला 483.19 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

मार्च 2024 तिमाहीत रतन इंडिया पॉवर कंपनीने 995.73 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर एका वर्षांपूर्वी याच तिमाहीत कंपनीने 988.64 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 8.896.75 रुपये नोंदवला गेला होता. मागील आर्थिक वर्षांत या कंपनीला 1,869,85 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. संपूर्ण 2023-24 या आर्थिक वर्षात रतन इंडिया पॉवर कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 3.704.78 कोटी रुपये नोंदवले गेला आहे. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात या कंपनीचे एकूण उत्पन्न 3,559.36 कोटी रुपये नोंदवले गेले होते.

रतन इंडिया पॉवर ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 106 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 98 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात रतन इंडिया पॉवर स्टॉक 444.78 टक्के मजबूत झाला आहे. या कंपनीचे शेअर्स आज आपल्या नवीन 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. रतन इंडिया पॉवर स्टॉक आपल्या 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसाच्या दीर्घकालीन मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rattan Power Share Price NSE Live 31 May 2024.

हॅशटॅग्स

Rattan Power Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x