25 November 2024 1:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉकचार्टवर कोणते संकेत? स्टॉक रेटिंग बदलली, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या भारतातील दिग्गज पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच या कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक 54 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.96 टक्के वाढीसह 47.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. 27 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 45.26 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 20 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.5 लाख रुपये झाले असते.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.72 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.46 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 61,571 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या ऑर्डरचा प्रवाह 3.1GW होता. आत्तापर्यंत या कंपनीला 402 MW क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीची ऑर्डर मिळाली आहे. सध्या सुझलॉन एनर्जी कंपनीचा ऑर्डर अनुशेष 3.3 GW आहे.

मजबूत ऑर्डर बुकमुळे अनेक तज्ञ सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक पुढील काळात 54 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च 2024 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीचा नफा 21 टक्क्यांनी घसरून 254 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा 320 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 2,207.43 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत 1,699.96 कोटी रुपये होते. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीने 660 कोटी रुपये नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या कंपनीने 2,887 कोटी रुपये नफा कमावला होता. म्हणजेच 2023-24 मध्ये कंपनीचा नफा मोठ्या प्रमाणात घटला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण उत्पन्न 2022-23 मध्ये 5,990.16 कोटी रुपये नोंदवले गेले होते. जे मार्च 2024 तिमाहीत 6,567.51 कोटी रुपये झाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 31 May 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x