22 November 2024 3:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, ऑर्डरबुक मजबूत झाली, कमाईची मोठी संधी

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.3 टक्के वाढीसह 384.50 रुपये किमतीवर पोहोचले होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला आहे. या कंपनीचे शेअर्स तेजीत येण्याचे मुख्य कारण म्हणजे, आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून 38.10 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )

आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.30 टक्के वाढीसह 383.95 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाकडून चंपा सारगाव-बराद्वार-सक्ती सेगमेंट दरम्यान ऑटो सिग्नलिंगसह इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, सामग्री पुरवठा, स्थापना, चाचणी, आणि कमिशनिंगचे काम देण्यात आले आहे. आरव्हीएनएल कंपनीला हे काम पुढील 15 महिन्यात पूर्ण करायचे आहे.

आरव्हीएनएल कंपनीला खरगपूर रेल्वे विभागासाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टमची रचना, पुरवठा, बांधकाम, चाचणी आणि कार्यान्वित करण्यासाठी दक्षिण पूर्व रेल्वे विभागाने 148 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. यासह आरव्हीएनएल कंपनीला नागपूर मेट्रो विभागाने कॅन्टोन्मेंट, केम्प्टी पोलीस स्टेशन, केम्प्टी नगरपरिषद, ड्रॅगन पॅलेस, गोल्फ क्लब आणि कन्हान प्रकल्पाची उभारणी करण्याचा कॉन्टॅक्ट दिला आहे. कंपनीला या प्रकल्पाची पूर्तता 30 महिन्यात करायची आहे.

27 मे 2024 रोजी आणि 30 मे 2023 रोजी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 399 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 110.50 रुपये होती. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या 4.32 टक्के खाली आणि 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या 246.11 टक्के वर ट्रेड करत आहे.

मागील 9 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 230 टक्के वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 400 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 31 May 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x