20 September 2024 8:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

Samvardhana Motherson Share Price | करोडपती करणारा स्वस्त शेअर, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, खरेदीला मोठी गर्दी

Samvardhana Motherson Share Price

Samvardhana Motherson Share Price| आयआयएफएल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या संवर्धन मदरसन कंपनीचे शेअर्स 152 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहेत. ( संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनी अंश )

तज्ञांच्या मते, हा स्टॉक 200 रुपये किमतीवर जाऊ शकतो. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल ही कंपनी विमान अपहोल्स्ट्री बनवणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल स्टॉक 0.86 टक्के घसरणीसह 150.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

आयआयएफएल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी यापूर्वी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 65-68 रुपये किंमत पातळीपासून खरेदी करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 95 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. आता हा स्टॉक 150 रुपये किमतीवर पोहोचला आहे. संवर्धन मदरसन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत.

1 जानेवारी 1999 रोजी ज्या गुंतवणूकदारांनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 190,337 टक्के वाढले आहे. म्हणजेच या कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणुकदारांना अक्षरशः करोडपती केले आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने 1444 कोटी रुपये नफा कमावला आहे. या कंपनीची तिमाही कामगिरी पाहून तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Samvardhana Motherson Share Price NSE Live 01 June 2024.

हॅशटॅग्स

Samvardhana Motherson Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x