22 November 2024 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Rajnish Retail Share Price | स्टॉक प्राईस 83 रुपये, दिला 12000% परतावा, श्रीमंत करतोय हा शेअर

Rajnish Retail Share Price

Rajnish Retail Share Price | सोमवारी रजनीश रिटेल लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. ( रजनीश रिटेल लिमिटेड कंपनी अंश )

मंगळवारी रजनीश रिटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 87.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये लोअर सर्किट पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी रजनीश रिटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 83.03 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रजनीश रिटेल लिमिटेड कंपनीने 1:5 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनानुसार स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्टॉक एक्सचेंजला कळवली जाईल. मागील एका वर्षात रजनीश रिटेल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात रजनीश रिटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 36 टक्के वाढले आहेत.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 57 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात रजनीश रिटेल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 320 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे 12,000 टक्क्यांनी वाढवले आहे. याकाळात हा स्टॉक 72 पैशांवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. रजनीश रिटेल लिमिटेड या कंपनीने नुकताच नवीन सलून लाँच करून सौंदर्य आणि पर्सनल केअर उद्योगात प्रवेश केला आहे. रजनीश रिटेल लिमिटेड कंपनीचा ब्रँड असलेल्या अर्बन सलूनने मुंबईतील मालाडमध्ये एव्हरशाईन नगर याठिकाणी आपले नवीन सलून लाँच केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rajnish Retail Share Price NSE Live 05 June 2024.

हॅशटॅग्स

Rajnish Retail Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x