3 November 2024 6:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार, कमाईची मोठी संधी, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IRB Share Price | IRB शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, 51 टक्क्यांहून अधिक परतावा मिळेल - NSE: IRB Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडामार्फत 1 करोड जमा करण्यासाठी 8-4-3 फॉर्मुला वापरा, वेगाने वाढेल पैशाने पैसा - Marathi News Gratuity on Salary | 5 वर्षापेक्षा कमी नोकरी करणाऱ्यांना सुद्धा मिळणार ग्रॅच्युईटीचे 20 लाख रुपये, फायद्याची अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | पोस्टाच्या जबरदस्त योजनेत चांगल्या परताव्यासह मिळणार टॅक्स सूट, फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या Salary Account Benefits | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट असेल तर 'या' गोष्टी माहित करून घ्या, फ्री मिळतात अनेक सुविधा Smart Investment | 15x15x15 चा फॉर्मुला बनवेल कोट्याधीश, घरात पेशाची कमी होणार नाही, श्रीमंतांचं हे सूत्र फॉलो करा
x

KPI Green Energy Share Price | अवघ्या 3 वर्षात दिला 10,000% परतावा, आता स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या

KPI Green Energy Share Price

KPI Green Energy Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1,913.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या उच्च स्तरावरून शेअरमध्ये विक्री वाढली आणि शेअर 1,845.00 रुपये किमतीवर क्लोज झाला. ( केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश )

आज बुधवार दिनांक 5 जून रोजी केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. या कंपनीच्या शेअर्सचा ROE 30 टक्के आणि ROCE 22 टक्के आहे.

केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीची स्थापना 2008 साली झाली होती. ही अक्षय ऊर्जा कंपनी KP समूहाचा भाग असलेल्या “Solarism” ब्रँड अंतर्गत स्वतंत्र उर्जा उत्पादक आणि कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्यूसर्स यांना सेवा प्रदान करणारी कंपनी म्हणून व्यवसाय करते. आज बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 1,667.70 रुपये किमतींवर ट्रेड करत आहे.

केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी सौरऊर्जा प्रकल्प विकसित करते, तसेच ही त्यांची मालकी आणि व्यवस्थापन, एंड-टू-एंड सोल्यूशन्स सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी आयपीपी म्हणून सौर ऊर्जा वीज निर्मिती करते, आणि वीज खरेदी करारद्वारे इतर ग्राहकांना तसेच उद्योगांना विकते. CPP करता केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी क्लायंटच्या साइटवर ग्रिड-कनेक्टेड सोलर इन्स्टॉलेश स्थापन करते, तसेच त्यांचे ऑपरेशन आणि देखभाल सेवा देखील प्रदान करते.

नुकताच केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने इक्विटी शेअर्सचे विभाजन करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 5 रुपयेच्या 2 भागात विभाजित करणार आहे. यापूर्वी केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

मागील 1 वर्षात केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 450 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1,100 टक्के नफा कमावून दिला आहे. अवघ्या 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 10,000 टक्के वाढवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPI Green Energy Share Price NSE Live 05 June 2024.

हॅशटॅग्स

KPI Green Energy Share Price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x