22 November 2024 5:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Reliance Share Price | रिलायन्ससहित टॉप कंपन्यांचे शेअर्स स्वस्तात खरेदीची संधी? किती फायदा होईल?

Reliance Share Price

Reliance Share Price | मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे लागलेले निकाल हे एक्झीट पोलपेक्षा वेगळे होते. यावरून लोकांमध्ये एक्झीट पोल खोटे आणि बेसलेस असतात अशी धारणा निर्माण झाली आहे. भाजप आपल्या 2014 आणि 2019 च्या स्वबळाच्या आकड्याच्या जवळ देखील पोहोचली नाही. 400 पारचा दावा करणाऱ्या भाजपला 2014 आणि 2019 चा आकडा देखील स्पर्श करता आला नाही.

आता भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी इतर मित्र पक्षावर अवलंबून राहणार आहे. याचा नकारात्मक परिमाण भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला आहे. सोमवारी निफ्टी इंडेक्स 733 अंकांच्या वाढीसह 23264 अंकावर ट्रेड करत होता. तर सेन्सेक्स इंडेक्स 2507 अंकांच्या वाढीसह 76469 अंकावर क्लोज झाला होता.

सोमवारी शेअर बाजारात जबरदस्त खरेदी सुरू होती. मात्र मंगळवारी शेअर बाजार अक्षरशः क्रॅश झाला होता. एवढेच नाही तर शेअर बाजार कोरोना लोक डाऊननंतर सर्वात जास्त घसरला होता. सोमवारी अदानी पोर्ट्स, एसबीआय, एनटीपीसी, पॉवर ग्रिड तेजीत धावत होते. मात्र मंगळवारी या सर्व शेअर्समध्ये तुफान विक्री पाहायला मिळाली.

याचा सर्वाधिक फटका अदानी समूह आणि मुकेश अंबानी यांच्या RIL कंपनीला बसला होता. तसेच सरकारी कंपन्यांचे शेअर्स देखील 10-20 टक्के लोअर सर्किटमध्ये अडकले होते. मागील काही महिन्यांपासून एफआयआयनी भारतीय शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली होती, त्यामुळे शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती.

तज्ञांच्या मते, जर भाजपने स्वबळावर पूर्ण बहुमत प्राप्त करून NDA ची सरकार बनवली असती तर शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली असती. ही परिस्थिती मोठ्या खाजगी बँका आणि रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी समुहाच्या शेअर्ससाठी अनुकूल ठरली असती. मंगळवारी एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक आणि कोटक महिंद्रा बँक या खाजगी वित्तीय संस्थाचे शेअर्स कमालीचे कोसळले होते. दरम्यान अशा घसरणीच्या काळात ब्रोकरेज फर्मने दीर्घमुदतीसाठी रिअल इस्टेट, उद्योग आणि पॉवर स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

आता लोकसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर शेअर बाजाराचे पूर्ण लक्ष नवीन सरकारच्या अर्थसंकल्पावर असेल. निवडणुकीपूर्वी आंतरिक बजेट सादर करण्यात आला होता. आता NDA गट सरकार स्थापन करून करून नवीन बजेट जाहीर करेपर्यंत शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळू शकते. देशात स्थिर सरकार सत्तेत येण्याचे अनेक फायदे असतात. याचा परिमाण देशाची अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक बाजारावर पाहायला मिळत असतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Share Price NSE Live 05 June 2024.

हॅशटॅग्स

Reliance Share price(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x