24 November 2024 12:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
x

Ashok Leyland Share Price | तज्ज्ञांकडून अशोक लेलँड स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देईल

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. अशोक लेलँड ही कंपनी मुख्यतः बस आणि ट्रक यांसारख्या व्यावसायिक वाहनांचे उत्पादन करते. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्क्यांच्या वाढीसह 236.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. ( अशोक लेलँड कंपनी अंश )

अशोक लेलँड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 69,006 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 144.50 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 7.61 टक्के वाढीसह 223.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 67 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 155 टक्के वाढली आहे. मागील 10 वर्षांत अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 601 टक्के परतावा कमावून दिला आहे. Goldman Sachs, CITI आणि CLSA ने अशोक लेलँड स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Goldman Sachs आणि CITI ने अशोक लेलँड स्टॉकची टारगेट प्राइस अनुक्रमे 260 रुपये आणि 245 रुपये निश्चित केली आहे. ब्रोकरेज हाऊस CLSA च्या मते, अशोक लेलँड स्टॉक पुढील काळात 258 रुपये किमतीवर जाऊ शकतो. अशोक लेलँड कंपनीने मे महिन्यात एकूण घाऊक विक्रीत 12 टक्के वाढ नोंदवली आहे. एका वर्षभरापूर्वी या कंपनीने 12378 युनिट्स वाहनांची घाऊक विक्री केली होती. या तुलनेत कंपनीची विक्री वाढून 13,852 युनिट्सवर पोहोचली आहे.

अशोक लेलँडने आपल्या निवेदनात माहिती दिली की, देशांतर्गत बाजारपेठेत कंपनीने मध्यम आणि जड व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत 8,551 युनिट्ससह 13 टक्के वाढ नोंदवली आहे. मागील वर्षी हे प्रमाण 7,590 युनिट्स एवढे होते. अशोक लेलँड कंपनीच्या हलक्या व्यावसायिक वाहनांची विक्री मे 2024 महिन्यात 11 टक्क्यांनी वाढून 5,301 युनिट्स नोंदवली गेली आहे. हे प्रमाण मे 2023 महिन्यात 4,788 युनिट्स नोंदवले गेले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 05 June 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x