HAL Vs BEL Share Price | दोन टॉप PSU शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून आऊटपरफॉर्म रेटिंग, पुढे मिळेल मोठा परतावा
HAL Vs BEL Share Price | मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि शेअर बाजारात अक्षरशः गोंधळ पाहायला मिळाला. अनेक सरकारी कंपन्यांचे शेअर्स 25 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले होते. एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 दिवसात 20 टक्के खाली आले आहेत.
मात्र शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, एचएएल स्टॉक पुढील काळात 4730 रुपये किमतीच्या पार जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 6 जून 2024 रोजी एचएएल स्टॉक 8.09 टक्के वाढीसह 4,718.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
परकीय ब्रोकरेज हाऊस CLSA ने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर आउटपरफॉर्म रेटिंग देऊन 4731 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. मंगळवारी एचएएल स्टॉक जबरदस्त घसरणीसह 4337.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर बुधवारी या कंपनीचे शेअर 7 टक्क्यांपेक्षा जास्त घसरणीसह 3918.50 रुपये किमतीवर आले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5434.90 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1646.10 रुपये होती.
ब्रोकरेज हाऊस CLSA ने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरवर देखील आऊटपरफॉर्म रेटिंग जाहीर केली आहे. मंगळवारी बीईएल कंपनीचे शेअर्स 19 टक्क्याच्या घसरणीसह ट्रेड करत होते. आज हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतो. म्हणून CLSA ने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 294 रुपये निश्चित केली आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 259.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 6 जून 2024 रोजी BEL स्टॉक 5.93 टक्के वाढीसह 275.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | HAL Vs BEL Share Price NSE Live 06 June 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS