26 November 2024 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Low Cost Business | कमी पैशांत सुरू होणाऱ्या या व्यवसायातून करा लाखोंची कमाई; अशी करा सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण माहिती Quant Small Cap Fund | मार्ग श्रीमंतीचा, 10,000 रुपयांच्या SIP बचतीवर मिळतील 5 कोटी रुपये, इथे पैसा वाढवा - Marathi News Post Office Scheme | गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना; लाखोंचा परतावा हवा असल्यास, पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची BEL Vs HAL Share Price | BEL आणि HAL सहित हे 3 डिफेन्स शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा, यापूर्वी 573% परतावा दिला - NSE: IRB Horoscope Today | आज या 5 राशींचे नशीब फळफळणार; काहींना मिळणार प्रमोशन तर, काहींना व्यवसायात वृद्धी, पहा तुमची रास कोणती Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा - NSE: RELIANCE
x

Amara Raja Share Price | TDP पक्षाच्या नेत्यासंबंधित कंपनीचा शेअर तुफान तेजीत, वेळीच खरेदी करा

Amara Raja Share Price

Amara Raja Share Price | अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटी कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. या कंपनीचा खूप जवळचा संबंध चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाशी आहे. अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी जयदेव उर्फ जय गल्ला, TDP पक्षाचे माजी नेते आहेत. ते दोन वेळा खासदार होते. यंदा त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता.

अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटी कंपनीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार प्रवर्तकांनी कंपनीचे 32.86 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आज गुरूवार दिनांक 6 जून 2024 रोजी अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटी स्टॉक 5.60 टक्के वाढीसह 1,285.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आरएन गल्ला फॅमिली प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटी कंपनीमधील प्रवर्तकाचा हिस्सा होल्ड केला आहे. सार्वजनिक गुंतवणुकदारांकडे कंपनीचे 67.14 टक्के भाग भांडवल आहेत. 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,278 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 599 रुपये होती.

केंद्र सरकारमध्ये टीडीपीची भूमिका महत्त्वाची असणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहेत . या नव्या आघाडी सरकारमध्ये चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्याचवेळी आंध्र प्रदेश विधानसभेत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राज्यात देखील टीडीपी पक्ष सरकार स्थापन करणार आहे. TDP ने लोकसभेच्या 17 जागा लढवल्या होत्या, त्यात त्यांना 16 जागावर विजय मिळाला होता.

डीआरएस फिनव्हेस्ट फर्मच्या तज्ञांच्या मते, अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटी कंपनीच्या शेअरमध्ये चढ-उतार पाहायला मिळू शकते. तज्ञांच्या मते, अमारा राजा एनर्जी स्टॉक पुढील काळात 1350 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीमध्ये अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटी कंपनीने निव्वळ नफ्यात 61.4 टक्क्यांची वार्षिक वाढीसह 230 कोटी रुपये नफा कमावला होता. याच तिमाहीत कंपनीचे ऑपरेशनल महसूल 19.5 टक्के वाढीसह 2908 कोटी रुपयेवर पोहचले आहेत. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 2433 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या कंपनीचा EBITDA मार्च तिमाहीत 16.2 टक्क्यांच्या वाढीसह 410 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Amara Raja Share Price NSE Live 06 June 2024.

हॅशटॅग्स

Amara Raja Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x