22 November 2024 7:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 15 रुपये! तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल 66 टक्के परतावा

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू झाली आहे. गुरुवारी शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी व्होडाफोन आयडिया स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या होत्या. अनेक तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया स्टॉक पुढील काळात 25 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 1.35 टक्क्यांच्या वाढीसह 15.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 3.67 टक्के वाढीसह 15.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

व्होडाफोन आयडिया स्टॉक सध्या आपल्या 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसांच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन मूव्हिंग ॲव्हरेज किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेड ही कंपनी आदित्य बिर्ला ग्रुप आणि व्होडाफोन ग्रुपचा भाग आहे. ही कंपनी 2G, 3G आणि 4G संबंधित व्हॉइस आणि डेटा सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. नुकताच शेअर बाजारातील तज्ञांनी व्होडाफोन आयडिया स्टॉकवर 25 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात सध्याच्या किमतीच्या तुलनेत 66.66 टक्क्यांनी वाढू शकतो.

व्होडाफोन आयडिया कंपनीवर विविध बँकांचे 4000 कोटी रुपये निव्वळ कर्ज आहे. पुढील काही वर्ष व्होडाफोन आयडिया कंपनीला तोटा सहन करावा लागणार आहे. या कंपनीचा EBITDA सकारात्मक होण्याच्या मार्गावर आहेत. पुढील एका वर्षात कंपनीचा रोख प्रवाह सकारात्मक होईल. तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीच्या ग्राहकांची संख्या देखील वाढताना पाहायला मिळेल. तसेच कंपनीला 5G विस्तार योजनेचा देखील कंपनीला फायदा होऊ शकतो.

मार्च 2024 तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीला 7675 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये डिसेंबर तिमाहीत या कंपनीला 6,419 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. या कंपनीचा ऑपरेटिंग महसूल तिमाही-दर-तिमाही आधारावर 0.6 टक्क्यांनी घसरून मार्च तिमाहीत 10,607 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. डिसेंबर तिमाहीत या कंपनीचा महसूल 10,673 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 07 June 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x