23 November 2024 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Patel Engineering Share Price | शेअर प्राईस रु.58, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड, यापूर्वी 339% परतावा दिला

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार पडझड पाहायला मिळत आहे. पटेल इंजिनीअरिंग या सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स गुरुवारी 4.05 टक्के वाढीसह 59.36 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. फेब्रुवारी 2024 महिन्यात या कंपनीचे शेअर 79 रुपये या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.

इन्फोमेरिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंग्स फर्मने पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे क्रेडिट रेटिंग सुधारित केले आहेत. यामुळे गुरुवारी हा स्टॉक तेजीत आला होता. आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी पटेल इंजिनीअरिंग स्टॉक 0.67 टक्के घसरणीसह 58.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

क्रेडिट रेटिंग एजन्सी इन्फोमेरिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंग्सने पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरची दीर्घकालीन रेटिंग IVR BBB+ वरून IVR A अशी अपडेट केली आहे. तर शॉर्टटीम रेटिंग IVR A2 वरून IVR A2+ अपडेट केली आहे. मागील एका वर्षात पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 107 टक्के परतावा कमावून दिला आहे.

2024 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत हा स्टॉक 8.5 टक्के घसरला आहे. मागील तीन वर्षात पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 339 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 167 टक्के वाढवले आहेत.

22 जून 2023 रोजी पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 28.01 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मार्च 2024 तिमाहीत पटेल इंजिनीअरिंग कंपनीचा नफा वाढून 141 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 84.8 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

मागील आर्थिक वर्षात मार्च तिमाहीत पटेल इंजिनीअरिंग कंपनीने 1326.2 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 1374.4 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मार्च तिमाहीत या कंपनीचा एबिटा वाढून 237.6 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाही कालावधीत कंपनीचा EBITDA 180.6 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

पटेल इंजिनीअरिंग कंपनीचा एबिटा मार्जिन मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीच्या तुलनेत 13.91 टक्केवरून वाढून 17.69 टक्केवर गेला आहे. 31 मार्च 2024 पर्यंत पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 18,663 कोटी रुपये होता. पटेल इंजिनीअरिंग ही कंपनी मुख्यतः सिव्हिल इंजिनीअरिंग आणि जलविद्युत प्रकल्प, धरणे, बोगदे, रस्ते, रेल्वेचे बांधकाम संबंधित व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patel Engineering Share Price NSE Live 07 June 2024.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x