24 November 2024 7:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

RVNL Share Price | PSU स्टॉक खरेदी करा, 1 महिन्यात दिला 33% परतावा, पुढे पुन्हा मल्टिबॅगर?

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मागील एका वर्षभरात मालामाल केले आहे. आज या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. बुधवारी आरव्हीएनएल कंपनीने माहिती दिली की, कंपनीला 38 कोटी रुपये मूल्याचे नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. त्यानंतर हा स्टॉक एका दिवसात 8.32 टक्क्यांच्या वाढीसह 382.90 रुपये किमतीवर पोहचला होता. आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.51 टक्के वाढीसह 374.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून 38.10 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. यामधे कंपनीला बिलासपूर विभागात सिग्नलिंग आणि इंटरलॉकिंग संबंधित काम करायचे आहे. हे काम करण्यासाठी कंपनीला 15 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मागील एका महिन्यात रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 33.30 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 112.80 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

मागील एका वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरची किंमत 223.90 टक्क्यांनी वाढली आहे. सोमवारी आरव्हीएनएल स्टॉक 424.95 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 116.17 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडावल 79,533.90 कोटी रुपये आहे. आरव्हीएनएल कंपनीमध्ये भारत सरकारचा वाटा या 72.80 टक्के आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांचा वाटा 18.66 टक्के आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 07 June 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(144)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x