17 September 2024 1:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shraddha Arya | दिपीकानंतर अभिनेत्री श्रद्धा आर्यने दिली गूडन्यूज; बीचवरचा दोघांचा 'तो' व्हिडियो होतोय वायरल - Marathi News BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राइस नोट करा - Marathi News NMDC Share Price | झटपट कमाईची मोठी संधी, NMDC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, संधी सोडू नका - Marathi News Post Office Saving Scheme | 1 हजाराच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला सलग 5 वर्ष मिळतील रु.20000; फायदा घ्या - Marathi News Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट, स्टॉक रॉकेट स्पीडने देणार परतावा - Marathi News Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरची जादू, 1 वर्षात 1 लाख रुपयांचे झाले 2.3 कोटी रुपये - Marathi News EPFO Passbook | नोकरदारांनो! EPF बॅलेन्स चेक करण्यासाठी हे 4 मार्ग आहेत बेस्ट, घरबसल्या होईल काम - Marathi News
x

SBI Mutual Fund | मुलाच्या जन्मावेळी रु.5000 SIP करा, उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 1.12 कोटी रुपये मिळतील

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | प्रत्येक पालक मुलांच्या सोनेरी भवितव्याची कल्पना करतो. त्यासाठी त्यांनी आपल्या चांगल्या भविष्यासाठी लवकरात लवकर आर्थिक नियोजन सुरू करणे गरजेचे आहे. कारण मुलं मोठी झाल्यावर उच्च शिक्षण किंवा तत्सम खर्च सोपा नसतो. मुलांचे भवितव्य तेव्हाच चांगले होईल जेव्हा ते आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असतील.

मुलांच्या आर्थिक नियोजनाचा विचार केला तर बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यापैकीच एक म्हणजे चाइल्ड म्युच्युअल फंड, ज्याकडे कमी लक्ष दिले जाते. हा एक गुंतवणुकीचा पर्याय आहे जो आपल्या मुलासाठी दीर्घ मुदतीसाठी मोठा निधी तयार करू शकतो.

चाइल्ड केअर फंडची विशेषतः
म्युच्युअल फंड मुलांचे भवितव्य लक्षात घेऊन आणि गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या उद्दिष्टांनुसार योजना जारी करतात, ज्यामध्ये म्युच्युअल फंड घराण्यांकडून चिल्ड्रन्स गिफ्ट फंड, चिल्ड्रन्स अॅसेट प्लॅन आणि चिल्ड्रन्स करिअर प्लॅन या नावाने अनेक योजना राबविल्या जात आहेत. चाइल्ड केअर फंड हे प्रामुख्याने हायब्रीड म्युच्युअल फंड असतात. ते चांगले वैविध्यपूर्ण आहेत. कॉर्पसचा काही भाग सुरक्षित समजल्या जाणाऱ्या डेट स्कीम किंवा डेट बाँड्समध्ये गुंतवला जातो, तर कॉर्पस इक्विटीमध्ये ही काही भाग गुंतवतो, जे डेट बाँड्सपेक्षा जास्त परतावा देतात.

फंडाचे उदाहरण – SBI मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड आणि ICICI प्रू चाइल्ड केअर फंड
चाइल्ड फंडातील एखाद्या योजनेच्या उदाहरणाद्वारे, आपण समजू शकता की प्रौढ झाल्यावर आपल्या मुलासाठी ते कसे उपयुक्त ठरू शकते. आम्ही येथे आयसीआयसीआय प्रू चाइल्ड केअर फंड या योजनेचे उदाहरण घेतले आहे, ज्यामध्ये 22 वर्षांचे एसआयपीआकडे उपलब्ध आहेत.

आयसीआयसीआय प्रू चाइल्ड केअर फंड
* लॉन्च डेट: 31 अगस्त 2001
* लाँचिंगनंतरचा परतावा : 16 टक्के वार्षिक
* किमान एकरकमी गुंतवणूक : 5000 रुपये
* कमीतकमी एसआयपी : 100 रुपये
* एकूण मालमत्ता : 1258 कोटी रुपये (30 एप्रिल 2024)
* एक्सपेंस रेश्यो : 2.20% (30 एप्रिल 2024)

फंडाचा एसआयपी परतावा
* मासिक एसआयपी : 5000 रुपये
* 22 वर्षातील वार्षिक परतावा : 15.07%
* 22 वर्षातील एकूण गुंतवणूक : 14,20,000 रुपये
* 22 वर्षांनंतर एसआयपीचे मूल्य : 1,11,93,954 रुपये

म्हणजेच जर कोणी मुलाच्या जन्मानंतर योजनेत 5000 रुपयांचा एसआरपी सुरू केला तर 22 वर्षे पूर्ण होताच मुलासाठी 1.12 कोटी रुपये तयार होते.

एकरकमी गुंतवणुकीवर परतावा चार्ट
* 10 वर्षांचा परतावा : 13.31 टक्के वार्षिक
* 7 वर्षांचा परतावा : 13.56% वार्षिक
* 5 वर्षांचा परतावा : 15.48% वार्षिक
* 3 वर्षांचा परतावा : 19.60% वार्षिक
* 1 वर्षाचा परतावा : 42.34% वार्षिक

परतावा (5 वर्षांचा परतावा) देण्यातही हे फंड आघाडीवर आहेत
* HDFC चिल्ड्रन्स गिफ्ट फंड : 18.1 टक्के वार्षिक
* Tata यंग सिटीझन फंड : 18.1 टक्के वार्षिक
* UTI चिल्ड्रन्स इक्विटी फंड : 17.1 टक्के वार्षिक
* ABSL बाल भविष्य योजना : 13.2% वार्षिक
* AXIS चिल्ड्रन्स गिफ्ट फंड : 13 टक्के वार्षिक
* LIC MF चिल्ड्रन्स गिफ्ट फंड : 12.8 टक्के वार्षिक
* SBI मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड: 11.9% वार्षिक

मुलांसाठी म्युच्युअल फंड एसआयपी अधिक चांगली
मुलांच्या भवितव्यासाठी आर्थिक उद्दिष्ट असेल तर ते दीर्घकालीन ठरेल. साधारणपणे याचा कालावधी 10 वर्षे ते 20 वर्षांपर्यंत असू शकतो. दीर्घ मुदतीत बाजारातील जोखीम कव्हर केली जाते. अशा वेळी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) माध्यमातून इक्विटी फंडात गुंतवणूक करणे शहाणपणाचे ठरते. मुलांसाठी चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या इक्विटी म्युच्युअल फंडात दीर्घकाळ गुंतवणूक करता येते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : SBI Mutual Fund Magnum Children’s Benefit Fund NAV 08 June 2024.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(108)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x