23 November 2024 3:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

RVNL Share Price | पटापट परतावा देतोय RVNL स्टॉक, 1 महिन्यात दिला 35% परतावा, वेळीच खरेदी करा

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी सुरू झाली आहे. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 495 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार त्यांना एनटीपीसीकडून 495 कोटी रुपये मूल्याचे काम मिळाले आहे, जे त्यांना 66 महिन्यांत पूर्ण करायचे आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 375.35 रुपये किमतीवर पोहचले होते. या स्टॉकचा इंट्रा-डे उच्चांक 382 रुपये होता. शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.71 टक्के वाढीसह 374.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

यापूर्वी आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने 38.10 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला 15 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत आरव्हीएनएल कंपनीने 478.60 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 33.20 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

मागील वर्षी याच तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीने 359 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कालावधीत कंपनीने 6714 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर 17.4 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

रेल विकास निगम कंपनीचा EBITDA 21.8 टक्क्यांच्या वाढीसह 456.40 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 35 टक्क्यांनी वाढली आहे. जर तुम्ही 3 महिन्यांपूर्वी आरव्हीएनएल स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 57 टक्के वाढले असते.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 118.80 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 211.90 टक्के वाढली आहे. आरव्हीएनएल स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 424.95 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 116.15 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 08 June 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x