10 November 2024 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, या SBI म्युच्युअल फंडातील 37 रूपयांची बचत देईल मोठा परतावा, संधी सोडू नका - Marathi News
x

Infosys Share Price | इन्फोसिस शेअर ब्रेकआऊट देणार! सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा, फायदाच फायदा

Infosys Share Price

Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीचे शेअर्स शुक्रवारी मजबूत तेजीत वाढत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.35 टक्क्यांच्या वाढीसह 1539 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसा अखेर हा स्टॉक 4.13 टक्के वाढीसह 1533.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,731 रुपये होती. ( इन्फोसिस कंपनी अंश )

जून 2023 मध्ये हा स्टॉक 1,262.30 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. आज सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 2.10 टक्के घसरणीसह 1,501.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधरच्या तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसात हा स्टॉक 1585 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, या कंपनीच्या शेअर्सने 1480 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉकमध्ये 1,500 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर या स्टॉकची ब्रेकआऊट किंमत पातळी 1,550 रुपये किमतीवर आहे. तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यासाठी इन्फोसिस स्टॉकची ट्रेडिंग रेंज 1475 ते 1600 रुपये दरम्यान असेल. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने देखील हा स्टॉक 1580 रुपये टार्गेट प्राइस खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1490 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

इन्फोसिस कंपनीने मार्च तिमाहीत मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 30 टक्के वाढीसह 7,969 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत इन्फोसिस कंपनीने 6128 कोटी रुपये नफा कमावला आहे. मार्च 2024 तिमाहीत इन्फोसिस कंपनीने 1.3 टक्के वाढीसह 37,923 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 37441 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

इन्फोसिस कंपनीच्या अंदाजाप्रमाणे आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीच्या महसुलात 1.3 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे. या कंपनीचा ऑपरेटिंग मार्जिन 20 ते 22 टक्के राहण्याची शक्यता आहे. इन्फोसिस कंपनीने मागील वर्षी मार्च तिमाहीत 20.1 टक्के ऑपरेटिंग मार्जिन नोंदवले होते. तर संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीने 20.7 टक्के ऑपरेटिंग मार्जिन नोंदवला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 10 June 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x