22 November 2024 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

NMDC Share Price | PSU स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल तगडा परतावा, संधी सोडू नका

NMDC Share Price

NMDC Share Price | एनएमडीसी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, देशांतर्गत स्टीलच्या मागणीत वाढ झाल्यामुळे कंपनीची कमाई वाढू शकते. त्यामुळे तज्ञांच्या असा अंदाज आहे की हा स्टॉक 300 रुपये किंमत सहज स्पर्श करेल. आज सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी एनएमडीसी स्टॉक 1.43 टक्के घसरणीसह 254.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( एनएमडीसी कंपनी अंश )

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, मजबूत व्हॉल्यूम ग्रोथ आणि रिलायझेशनमधील गतीमुळे एनएमडीसी कंपनीच्या प्रॉफिट मार्जिनमध्ये चांगली वाढ पाहायला मिळू शकते. अनेक ब्रोकरेज हाऊसनी एनएमडीसी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 20 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 75770 कोटी रुपये आहे. एनएमडीसी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 286 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 103 रुपये होती.

मंगळवार दिनांक 4 जून रोजी एनएमडीसी स्टॉक 214 रुपये किमतीवर आला होता. अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीत या स्टॉकची किंमत 37 टक्के वाढली. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी एनएमडीसी कंपनीचे शेअर्स 73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 250 रुपये किमतीच्या पार गेला आहे.

मागील चार वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 250 टक्के नफा कमावून दिला आहे. 7 मार्च 2008 रोजी या कंपनीचे शेअर्स 327 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक जवळपास 21 टक्के घसरला होता. आता हा स्टॉक पुन्हा 300 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NMDC Share Price NSE Live 10 June 2024.

हॅशटॅग्स

NMDC Share price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x