24 November 2024 3:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्सची तुफान खरेदी, 2 दिवसात 12% परतावा दिला, नवीन अपडेट आली

Reliance Infra Share Price

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स सोमवारी 10 टक्के वाढीसह 185.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवसभराच्या व्यवहारात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 192.15 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचले होते. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची उपकंपनी Reliance Velocity Limited ने रिलायन्स ईव्ही प्रायव्हेट लिमिटेड ही नवीन कंपनी स्थापन केली आहे. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )

या कंपनीने कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाकडून इन्कॉर्पोरेशनचे प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती दिली आहे. Reliance Velocity Limited कंपनीने ऑटोमोबाईल्स आणि संबंधित क्रियाकलापांसाठी रिलायन्स ईव्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली आहे. आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 1.89 टक्के वाढीसह 189.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 3000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची योजना आखली आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी परकीय चलन परिवर्तनीय बॉड्सद्वारे 350 दशलक्ष डॉलर्स उभारण्याची शक्यता आहे. हे पैसे मुख्यतः कर्ज फेडण्यासाठी आणि इलेक्ट्रिक पॉवर निर्मितीचे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवले जाणार आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये प्रति शेअर 123 रुपये दराने FCCB च्या रूपाने 400 दशलक्ष डॉलर्स भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता, मात्र ही योजना पुढे नेली नाही.

मागील आठवड्यात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने 4 नवीन उपकंपन्या सुरू केल्याची माहिती दिली आहे. यामधे रिलायन्स जय प्रायव्हेट लिमिटेड, रिलायन्स अनलिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड, रिलायन्स ईव्ही प्रायव्हेट लिमिटेड आणि रिलायन्स राइज प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या आहेत. या कंपन्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित करतील. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक शिवाय रिलायन्स पॉवर शेअर देखील मजबूत तेजीत वाढत आहे.

रिलायन्स पॉवर स्टॉक सोमवारी 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 26.07 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 34.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13.80 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.13 टक्के वाढीसह 28.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Infra Share Price NSE Live 11 June 2024.

हॅशटॅग्स

Reliance Infra Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x