23 November 2024 8:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, खरेदी करा, मिळेल मोठा परतावा

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 4 जून रोजी या कंपनीचे शेअर्स घसरुन 159 रुपये किमतीवर आले होते. आता हा स्टॉक 12 टक्के वाढून 180 रुपये किमतीच्या पार गेला आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने 180 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.64 टक्के वाढीसह 181.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )

मागील आठवड्यात शुक्रवारी NCLT च्या हैदराबाद खंडपीठाने भुवनेश्वर पॉवर लिमिटेड कंपनीचे विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. 31 जुलै 2006 रोजी भुवनेश्वर पॉवर लिमिटेड कंपनीची स्थापना जॅस्पर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, टाटा स्टील व टाटा स्टील मायनिंग लिमिटेड कंपनीने संयुक्त उपक्रम म्हणून केली होती. 1 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा स्टील कंपनीने भुवनेश्वर पॉवर लिमिटेड कंपनीचे संपूर्ण भागभांडवल खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे.

मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 197 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 165 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज या कंपनीच्या शेअर्सने 183.75 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची नीचांकी किंमत पातळी 148 रुपये होती.

मागील आठवड्यात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 2.3 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 9 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 14 टक्के वाढवले आहेत.

2024 या वर्षात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची किंमत 28 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअरधारकांना 60 टक्के नफा कमावून दिला आहे. ब्रोकरेज फर्म ॲक्सिस डायरेक्टने टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 15 दिवसांसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 187 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 175 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 11 June 2024.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(118)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x