22 November 2024 6:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

IRB Infra Share Price | 67 रुपयाचा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत नवीन अपडेट, कमाईची मोठी संधी

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारी 10.20 टक्क्यांच्या घसरणीसह 63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. या स्टॉक मध्ये उलाढाल वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, फेरोव्हियल या डच कंपनीची उपकंपनी सिंट्राने IRB इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमधील 5 टक्के भाग भांडवल विकले आहेत. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी अंश )

या डीलमध्ये एकूण 42 कोटी शेअर्सचा व्यवहार झाला होता. या डीलचे एकूण मुल्य 2,656 कोटी रुपये होते. आज बुधवार दिनांक 12 जून 2024 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स स्टॉक 2.62 टक्के वाढीसह 67.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सिंट्रा कंपनीने 1,900.29 कोटी रुपये म्हणजेच जवळपास 227.8 दशलक्ष डॉलर्स भांडवल उभारणीसाठी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीतील आपले भाग भांडवल विकल्याची माहिती मिळत आहे. 31 मार्च 2024 पर्यंत CINTRA INR Investments BV कंपनीने IRB इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 24.86 टक्के भाग भांडवल धारण केले होते. या डीलसाठी जेफरीज आणि एचएसबीसीने बँकर्स म्हणून भूमिका बजावली होती. मागील 15 दिवसांत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीमध्ये दोन ब्लॉक डील पाहायला मिळाल्या आहेत. 30 मे 2024 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या प्रवर्तकांनी ब्लॉक डीलद्वारे कंपनीचे 4 टक्के भाग भांडवल विकले होते.

डिसेंबर 2021 मध्ये सिंट्रा कंपनीने 369 दशलक्ष युरो गुंतवणूक करून IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे 24.86 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते. मागील दोन दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. सोमवारी हा स्टॉक 9.05 टक्क्यांनी घसरून 70.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 2024 या वर्षात आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 135 टक्के वाढले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 78.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 24.97 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3924746 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infra Share Price NSE Live 12 June 2024.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x