12 January 2025 1:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची रेटिंग अपग्रेड, फायद्याच्या अपडेटनंतर खरेदीला ऑनलाईन गर्दी

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारी 2.5 टक्के वाढीसह 991 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने चालू आर्थिक वर्षात कर्जमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )

आज बुधवार दिनांक 12 जून 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.36 टक्के वाढीसह 990.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा मोटर्स कंपनीचा भाग असलेल्या जग्वार लँड रोव्हर कंपनी आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये निव्वळ कर्जमुक्त स्थिती प्राप्त करू शकते. टाटा मोटर्स कंपनीच्या कमर्शिअल व्हेईकल सेगमेंटमधील त्याचे लक्ष्य महसुलातील वाढीसह बाजारातील वाटा वाढवणे हे आहे. या कंपनीने प्रवासी वाहन विभागातील आपला वाटा 2027 पर्यंत 16 टक्के आणि पुढील 2-3 वर्षात 18-20 टक्के वाढवण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात टाटा मोटर्स कंपनीने आपले अग्रगण्य स्थान कायम ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या कंपनीचे उद्दिष्ट आर्थिक वर्ष 2030 पर्यंत बाजारपेठेतील 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा काबीज करण्याचे आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 989.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे.

YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 25 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 76 टक्के वाढवले आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,065.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 557.45 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,27,943.76 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 12 June 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(158)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x