23 November 2024 8:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Brightcom Share Price | करोडपती करणारा शेअर 10 रुपयांवर आला, स्टॉक 'Hold' करावा की 'Sell'

Brightcom Share Price

Brightcom Share Price | ब्राइटकॉम गृप कंपनीचे शेअर्स मंगळवारी 5 टक्के वाढीसह 10.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये जबरदस्त विक्री पाहायला मिळत आहे. सोमवारी ब्राइटकॉम गृप कंपनीचे शेअर्स 9.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले नाही. ( ब्राइटकॉम गृप कंपनी अंश )

मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण पहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 12 जून 2024 रोजी ब्राइटकॉम गृप स्टॉक 5.09 टक्के घसरणीसह 9.88 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

नुकताच सेबीने ब्राइटकॉम गृप कंपनीला शेअर्सची ट्रेडिंग थांबवण्याची नोटीस पाठवली होती. यामध्ये कंपनीला जून 2024 पासून ट्रेडिंग थांबवण्याची सूचना देण्यात आली होती. तेव्हापासून या कंपनीचे शेअर्स सातत्याने घसरत होते. मागील एका महिन्यात ब्राइटकॉम गृप कंपनीच्या शेअरची किंमत 18.94 टक्के घसरली आहे. तर 2024 मध्ये आतापर्यंत हा स्टॉक 47.58 टक्क्यांनी खाली आला आहे. या कंपनीने 11 जून 2024 पर्यंत मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर न केल्यामुळे ब्राइटकॉम गृप स्टॉकच्या ट्रेडिंगमध्ये खंड पडू शकतो.

ब्राइटकॉम कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, स्टॉक एक्सचेंज नियामकद्वारे सेट केलेल्या सर्व नियामक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ब्राइटकॉम गृप कंपनी वचनबद्ध आहे. ब्राइटकॉम गृप कंपनीचे शेअर्स टेक्निकल चार्टवर 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे.

ब्राइटकॉम गृप कंपनीच्या शेअर्सचा RSI 37.98 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हर सोल्ड झोनच्याजवळ ट्रेड करत आहे. ब्राइटकॉम गृप कंपनीच्या स्टॉकचे P/E गुणोत्तर 106.02 वर आहे. तर कंपनीचे P/B मूल्य 1.22 अंकावर आहे. कंपनीची प्रति शेअर कमाई 1.15 च्या इक्विटी ऑन रिटर्नसह 0.09 आहे.

मार्च 2024 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 18.38 टक्के भाग भांडवल धारण केले होते. शंकर शर्मा यांनी ब्राइटकॉम गृप कंपनीचे 1.14 टक्के भाग भांडवल म्हणजेच 2,29,25,000 शेअर्स होल्ड केले आहे. 2021 मध्ये या कंपनीचे शेअर्स 117 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Share Price NSE Live 12 June 2024.

हॅशटॅग्स

Brightcom Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x