22 November 2024 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

RVNL Share Price | RVNL स्टॉक देणार ब्रेकआऊट, PSU शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

RVNL Share Price

RVNL Share Price | मागील एका महिन्यात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 53.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे 221.44 टक्के वाढवले आहे. या कंपनीचे शेअर्स 424.95 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चनक किमतीवरून 7.75 टक्क्यांनी खाली आले आहेत. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

बुधवारी आरव्हीएनएल स्टॉक 0.65 टक्क्यांनी वाढून 392 रुपये किमतीवर पोहचला होता. आज गुरूवार दिनांक 13 जुन 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.12 टक्के घसरणीसह 387.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच आरव्हीएनएल कंपनीला मध्य रेल्वे विभागाने 138.46 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. तसेच बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशनने देखील कंपनीला 394.24 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. टेक्निकल चार्टवर या स्टॉकने 380-360 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.

तज्ञांच्या मते, हा स्टॉक 400 रुपये किमतीवर ब्रेकआऊट देऊ शकतो. एंजल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉकने 360 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकला 400 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 400 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर 420 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या मते, आरव्हीएनएल स्टॉकला 385 रुपये किमतीवर रेझिस्टन्स मिळत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 417 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 372 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉक 405 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवूकदारांनी हा स्टॉक खरेदी करताना 387 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावला पाहिजे.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉकने 380 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकला 400 रुपये किमतीवर प्रतिकार मिळत आहे. जर हा स्टॉक 400 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर 420 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. या स्टॉकची पुढील एका महिन्याची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 370 रुपये ते 435 रुपये दरम्यान असेल.

आरव्हीएनएल ही भारतीय रेल्वेची विकासात्मक शाखा आहे. ही कंपनी टर्नकी आधारावर कार्य करते. आरव्हीएनएल ही कंपनी संकल्पना तयार करणे, प्रकल्प पूर्ण करणे, डिझाइन, करारनामा यासारखे काम करते. मार्च 2024 पर्यंत आरव्हीएनएल कंपनीमध्ये भारत सरकारचा वाटा 72.84 टक्के होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 13 June 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x