23 November 2024 5:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागून 133% परतावा मिळेल

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आजपासून जीपी इको सोल्युशन कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. जीपी इको सोल्युशन ही एक सोलर कंपनी आहे. या कंपनीचा IPO 14 जून 2024 पासून गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. आणि याची अंतिम तारीख 19 जून 2024 असेल. या कंपनीच्या IPO इश्यूचा प्राइस बँड 90 ते 94 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. सध्या शेअर बाजारात किंचित सुधारणा पाहायला मिळत आहे, अशा काळात IPO मध्ये गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे ठरू शकते. ( जीपी इको सोल्युशन कंपनी अंश )

नोएडा-स्थित जीपी इको सोल्युशन कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे 32,76,000 फ्रेश इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. या IPO मध्ये 3.27 लाख इक्विटी शेअर्स अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. आणि 8.83 लाख इक्विटी शेअर्स गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील. NIIs साठी IPO मध्ये 4.44 लाख इक्विटी शेअर्स राखीव असतील, आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी 5.89 लाख इक्विटी शेअर्स राखीव असतील. जीपी इको सोल्युशन कंपनीने आपल्या IPO मध्ये 10.32 लाख शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवले आहेत.

जीपी इको सोल्युशन कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 2,000 शेअर्स ठेवले आहेत. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार ही कंपनी सोलर इन्व्हर्टर आणि पॅनेलचे वितरण करण्याचा व्यवसाय करते. जीपी इको सोल्युशन कंपनीने Corporate Capital Ventures Pvt Ltd कंपनीला IPO साठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. आणि BigShare Services Pvt Ltd कंपनीला IPO रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

SS कॉर्पोरेट सिक्युरिटीज फर्मला GP Eco Solutions IPO साठी मार्केट मेकर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, जीपी इको सोल्युशन कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 125 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा स्टॉक 219 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. ज्या दिवशी हा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध होईल, त्या पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना 133 टक्के नफा मिळेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP of GP Eco Solutions India Ltd 14 June 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(132)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x