22 November 2024 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

IREDA Share Price | PSU स्टॉक मालामाल करतोय, अल्पावधीत दिला 187% परतावा, पुढेही कमाई मोठी होणार

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आयआरईडीए म्हणजेच भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास एजन्सी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना एका महिन्यात 10.67 टक्के नफा कमावून दिला आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए स्टॉक 1.28 टक्के घसरणीसह 180.24 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.022 टक्के वाढीसह 180.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नोव्हेंबर 2023 मध्ये आयआरईडीए कंपनीचा IPO बाजारात लाँच करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीचे शेअर्स 187.73 टक्के वाढले आहेत. एप्रिल 2024 मध्ये भारत सरकारने या कंपनीला ‘नवरत्न’ दर्जा बहाल केला होता. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स सध्या ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे.

आयआरईडीए या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 48,500.71 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 214.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 50 रुपये होती.

आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये आयआरईडीए कंपनीचा महसूल 1,391.27 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने 1,252.85 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आर्थिक वर्ष 2023-2024 च्या मार्च तिमाहीत या कंपनीचा महसूल 337.38 कोटी रुपये होता, तर डिसेंबर तिमाहीत कंपनीने 335.54 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या कंपनीचा IPO मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात आला होता.

आयआरईडीए कंपनीने IPO मध्ये 2,150 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. या कंपनीने आपल्या IPO चा प्राइस बँड 30 ते 32 रुपये निश्चित केला होता. एका लॉटमध्ये कंपनीने 460 शेअर्स ठेवले होते. शेअर वाटप झाल्यावर आयआरईडीए कंपनीचा आयपीओ स्टॉक 29 नोव्हेंबर 2023 रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 14 June 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x