5 October 2024 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, स्वतःच्या आवडीची सीट अशी बूक करता येते, लक्षात ठेवा - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News SBI Special FD | SBI बँकेच्या 'या' जबरदस्त स्कीमला मुदतवाढ, बँकेत गर्दी, मोठ्या व्याजदरा सह मिळेल मोठा परतावा - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअरने दिला 600% परतावा, पुढे तेजी टिकून राहील का, तज्ज्ञांनी काय म्हटलं पहा - Marathi News Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात होणार रीयुनियन, पुन्हा एकदा पाहायला मिळणार अरबाज आणि निक्कीची केमिस्ट्री Loan Alert | नोकरदारांनो, 'या' चुकांमुळे कर्जाचा डोंगर डोक्यावरून कधीही उतरणार नाही, या गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News Smart Investment | गृहिणींनो आता डब्यात नाही तर बँकेत पैसे जमा करा, 500 रुपयांची SIP बनवेल लखपती - Marathi News
x

HFCL Share Price | 5G कंपन्यांचा विस्तार! 117 रुपयांचा HFCL शेअर शॉर्ट टर्म मध्ये 163 रुपयांवर पोहोचणार

HFCL Share Price

HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स अवघ्या चार महीन्यात आपल्या 23 वर्षाच्या उच्चांक किमतीवर पोहोचले आहेत. शुक्रवारी एचएफसीएल स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. ( एचएफसीएल कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म व्हेंचुराच्या मते जुलै 2022 मध्ये त्यांचा अंदाज होता की एचएफसीएल कंपनी आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचा महसूल 6673 कोटी रुपये, EBITDA 951 कोटी, आणि निव्वळ नफा 552 कोटी रुपये नोंदवेल. मात्र जगभरात ऑप्टिल फाइबर केबल्सची मागणी घटली असल्याने कंपनीची आर्थिक कामगिरी अपेक्षेप्रमाणे आली नाही. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी एचएफसीएल स्टॉक 4.52 टक्के वाढीसह 117.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

सध्या जगभरात 5G चा बोलबाला सुरू आहे. त्यामुळे ब्रोकरेज फर्मचा अंदाज आहे की, आर्थिक वर्ष 2027 पर्यंत एचएफसीएल कंपनीचा महसूल 10 हजार कोटी रुपयेपर्यंत जाईल. 2027 पर्यंत या कंपनीचा EBITDA 1581 कोटी रुपयेपर्यंत आणि निव्वळ नफा 942 कोटी रुपयेपर्यंत जाऊ शकतो.

तज्ञांच्या मते, फायबर टू द होम आणि डेटा सेंटर्समध्ये वाढ होत आहे. आणि टेलिकॉम ट्रान्समिशनशी संबंधित उत्पादनांची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याशिवाय संरक्षण क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रो-ऑप्टिक्स, ग्राउंड सर्व्हिलन्स रडार आणि नाईट व्हिजन उपकरणांची मागणी वाढत आहे. याचा फायदा एचएफसीएल सारख्या कंपन्यांना होऊ शकतो.

एचएफसीएल कंपनी पुढील काळात व्यवसाय विस्तार करण्यासाठी 1400 कोटी रुपते गुंतवणूक करू शकते. ब्रोकरेज फर्म व्हेंचुराच्या तज्ञांच्या मते, एचएफसीएल स्टॉक पुढील काळात 163 रुपये किमतीवर जाऊ शकतो. त्यामुळे तज्ञांनी या स्टॉकवर बाय रेटिंग जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या कंपनीत रिलायन्स ग्रुपची सुद्धा हिस्सेदारी आहे.

मागील एका वर्षात एचएफसीएल कंपनीचे शेअर्स 61.52 रुपये या नीचांक किमतीवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहे. 27 फेब्रुवारी 2024 रोजी एचएफसीएल स्टॉक 117.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. म्हणजेच मागील 4 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 91 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HFCL Share Price NSE Live 15 June 2024.

हॅशटॅग्स

HFCL Share Price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x