18 November 2024 7:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

SJVN Share Vs NHPC Share Price | SJVN आणि NHPC या PSU स्टॉकसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, शेअर्स मालामाल करणार

SJVN Share Vs NHPC Share Price

SJVN Share Vs NHPC Share Price | सर्व गुंतवणूकदारांच्या नजरा सरकारी कंपन्याच्या कामगिरीवर लागले आहे. शेअर बाजारातील तज्ञ सतलज जल विद्युत निगम आणि नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन या कंपन्याच्या कामगिरीबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, हे दोन स्टॉक गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.

SJVN Share Price
मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 20 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 250 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत SJVN स्टॉक तब्बल 350 टक्के मजबूत झाला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 150 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. भारत सरकारने या कंपनीचे 81.85 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या कंपनीमध्ये विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 2.36 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा 3.36 टक्के आहे. SJVN कंपनीने नुकताच 1.5 GW विजेचा लिलाव केला आहे. सतलज जल विद्युत निगम कंपनीच्या ग्रीन एनर्जी आर्मने 1500 मेगावॅट क्षमतेच्या हायब्रीड पॉवर प्रकल्पासाठी निविदा मागवल्या होत्या. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 11.5 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.49 टक्के वाढीसह 135.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

NHPC Share Price:
मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 124 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 88 टक्के वाढली आहे. LIC कंपनीने NHPC कंपनीचे 3.24 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. नुकताच या कंपनीने आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 5 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती.

2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 1.4 रुपये लाभांश वाटप केला होता. NHPC म्हणजेच नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन ही भारतात जलविद्युत क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मानली जाते. अनेक तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 150 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आनंद राठी फर्मच्या तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, NHPC स्टॉक पुढील काळात 22 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के वाढीसह 102.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Vs NHPC Share Price NSE Live 15 June 2024.

हॅशटॅग्स

SJVN Share Vs NHPC Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x