8 October 2024 10:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरला, पण तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल मल्टिबॅगर परतावा - Marathi News Rama Steel Share Price | 14 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, डिफेन्सनंतर ग्रीन एनर्जी क्षेत्रात प्रवेश, संधी सोडू नका - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर पुन्हा फोकसमध्ये, मालामाल करणार रिलायन्स ग्रुपचा शेअर - Marathi News 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सवर लक्ष्मीचा वर्षाव, या पे-बँडने DA चे ₹3,61,884 मिळणार - Marathi News Smart Investment | बँक FD विसरा, या 5 म्युच्युअल फंड योजना दर वर्षी 50 ते 70% परतावा देऊन पैसा वाढवतील - Marathi News Pension Life Certificate | असं घरबसल्या 'या' तारखेपर्यंत जमा करा लाईफ सर्टिफिकेट, अन्यथा पेन्शन बंद होईल - Marathi News CIBIL Score | पगारदारांनो, सिबिल रिपोर्टमधील ही माहिती असते अत्यंत महत्त्वाची, कोणासोबतही शेअर करू नका - Marathi News
x

Rites Share Price | PSU शेअरची तुफान खरेदी सुरू, फायद्याची अपडेट आली, अल्पावधीत मिळेल मोठा परतावा

Rites Share Price

Rites Share Price | राइट्स लिमिटेड या रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने नुकताच दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत एक सामंजस्य करार केला आहे. ( राइट्स लिमिटेड कंपनी अंश )

शुक्रवारी राइट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स इंट्रा-डे ट्रेडमध्ये 721 रुपये किमतीवर पोहोचले होते. शुक्रवारी 14 जून 2024 रोजी राइट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.69 टक्के वाढीसह 704.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

राइट्स लिमिटेड आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन या दोन्ही कंपन्या सामंजस्य करारांतर्गत मेट्रो रेल्वे, रोलिंग स्टॉक, डेपो मॅनेजमेंट, स्टेशन मॅनेजमेंट, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेनन्स यावर काम करणार आहे. 11 जून रोजी राइट्स लिमिटेड कंपनीने ईस्टर्न रेल्वे डिझेल शेडसोबत देखील सामंजस्य करार केला होता. आणि 6 जून रोजी या कंपनीला टाटा स्टील कंपनीने 39.63 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता. मागील एका महिन्यात राइट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 21 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात राइट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 85.9 टक्के वाढली आहे. RITS लिमिटेड कंपनीमधे भारत सरकारने 72.20 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. LIC ने या कंपनीचे 6.3 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. राइट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 826.15 रुपये आहे. तर नीचांक किंमत पातळी 365 रुपये आहे.

म्युच्युअल फंडांनी या कंपनीतील आपली हिस्सेदारी कमी केली आहे. डिसेंबर 2023 मध्ये म्युच्युअल फंडानी राइट्स लिमिटेड कंपनीचे 4.75 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर मार्चमध्ये हा वाटा 3.38 टक्क्यांवर आला होता. एकीकडे म्युचुअल फंड आपली गुंतवणूक कमी करत आहेत, तर दुसरीकडे परकीय गुंतवणूकदारांनी राइट्स लिमिटेड कंपनीमध्ये आपली गुंतवणूक वाढवली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rites Share Price NSE Live 15 June 2024.

हॅशटॅग्स

#RITES Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x