22 November 2024 2:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

राष्ट्रवादीच्या झुंजार नेत्या चित्रा वाघ देखील भाजपच्या वाटेवर?

NCP Leader Chitra Wagh, NCP Party, Sharad Pawar, Supriya Sule, Ajit Pawar, Maharashtra Assembly Election 2019, Devendra Fadanvis, BJP Maharashtra

मुंबई : जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तस तशी सत्ताधाऱ्यांच्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहेत. दलबदलीचा सर्वाधिक मोठा फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला बसत आहे. मात्र त्याचे लोन आता पक्षाचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघात देखील पसरू लागल्याचे दिसत आहे. तसाच काहीसा प्रकार सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या बाततीत घडणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र सुरु केले आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु आहेत. मात्र या मुलाखतीसाठी माढा मतदारसंघाचे आ. बबन शिंदे आणि बार्शीचे आ. दिलीप सोपल हे अनुउपस्थित आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं चर्चेने जोर पकडला आहे.

तत्पूर्वी ठाण्यातील एनसीपीचे नेते आणि शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. त्यानंतर बरोरो हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी एनसीपीला अजून किती धक्के बसणार ते पाहावं लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवामुळे आघाडीतून मोठ्या प्रमाणात आउटगोइंग सुरु आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याचे वृत्त आले आहे. वृत्तावाहीनिंनी दिलेल्या माहिती नुसार येत्या ३० जुलैला चित्रा वाघ या भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या तोंडावरच एनसीपीने मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता याचदरम्यान राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आले आहे.

येत्या ३० जुलैला चित्रा वाघ ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती वृत्तवाहिनिंनी दिली आहे. इतकेच नव्हे तर चित्रा वाघ यांच्या सोबतच बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल, म्हाढाचे आमदार बबन शिंदे, कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे समवेत १० आमदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x