22 November 2024 6:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

RVNL Share Price | PSU शेअर झटपट परतावा देतोय, 1 महिन्यात 42% कमाई, पुढेही मालामाल करणार

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. या कंपनीने ईस्ट कोस्ट रेल्वे प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावून कॉन्ट्रॅक्ट जिंकला आहे. या प्रकल्पाचे एकूण मूल्य 160.08 कोटी रुपये आहे. या कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, या प्रकल्पांतर्गत कंपनीला मल्टी-सेक्शन डिजिटल एक्सल काउंटरसह स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंगचे काम देण्यात आले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला 24 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.013 टक्के घसरणीसह 390.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

आरव्हीएनएल कंपनीला ईस्ट कोस्ट रेल्वे प्रकल्पात जाखापुरा-नेरगुंडी, खुर्दा रोड-भुसुंदपूर आणि भुसुंदपूर-गोलांधरा या भागात काम करायचे आहे. आरव्हीएनएल कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. या कंपनीने मागील एका वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. मागील एका महिन्यात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 42 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 60 टक्क्यांनी वाढली आहे. YTD आधारे आरव्हीएनएल स्टॉक तब्बल 114 टक्के वाढला आहे.

मागील एका वर्षात रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 215 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 424.95 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 116.15 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 81,315.78 कोटी रुपये आहे. मार्च 2024 तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीने 478.60 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 33.30 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. 2022-23 मधील मार्च तिमाहीत या कंपनीने 359 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जानेवारी ते मार्च 2024 या तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीने 6714 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 17 June 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x