22 November 2024 12:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

BEL Share Price | BEL शेअर ब्रेकआऊट देणार, टेक्निकल चार्टवर सकारात्मक संकेत, मोठा परतावा देणार

BEL Share Price

BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने मागील 6 वर्षांंत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 400 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मागील 12 महिन्यांत भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )

2024 या वर्षात कंपनीचे शेअर्स तब्बल 65 टक्के वाढले आहेत. 4 जून रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले होते. मात्र त्यानंतर हा स्टॉक अवघ्या एका आठवड्यात 25 टक्के वाढला आहे. आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.26 टक्के वाढीसह 319.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

4 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते. त्यादिवशी शेअर बाजारातील जवळपास सर्वच शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या घसरणीसह 230 रुपये किमतीवर आले होते. तज्ञांच्या मते, टेक्निकल चार्टवर हा स्टॉक सकारात्मक वाढीचे संकेत देत आहे. या स्टॉकमध्ये 320-325 रुपये किंमत पातळी खूप महत्त्वाची आहे. जर हा स्टॉक 325 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर अल्पावधीत 375 रुपये ते 400 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड स्टॉकला मजबूत ब्रेकआऊट देण्यासाठी 318 रुपये किंमत पार करावी लागेल. 2018 पासून भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. 2024 मध्ये या कंपनीला अनेक मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीकडे दीर्घकाळ काम करता येईल इतक्या ऑर्डर प्रलंबित आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEL Share Price NSE Live 18 June 2024.

हॅशटॅग्स

BEL Share Price(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x