22 November 2024 11:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Patel Engineering Share Price | शेअर प्राईस 73 रुपये! तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, यापूर्वी दिला 400% परतावा

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 3 टक्क्यांच्या वाढीसह 67.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 79 रुपये आहे. तर नीचांक किंमत 28.01 रुपये आहे. ( पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी अंश )

मागील 1 वर्षात पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 400 टक्के वाढवले आहेत. आज बुधवार दिनांक 19 जून 2024 रोजी पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड स्टॉक 2.36 टक्के वाढीसह 73.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टने पटेल इंजिनिअरिंग स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 80 रुपये किमतीवर जाऊ शकतात. दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी देखील पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे.

डिसेंबर 2023 मध्ये त्यांचा वाटा 1.68 टक्क्यांवरून 1.55 टक्क्यांवर आला होता. पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 18,663 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये हायड्रोपॉवर, सिंचन, बोगदे, रस्ते आणि इतर प्रकल्प सामील आहेत.

नुकताच पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीने Tunneling & Infra Private Limited या कंपनीचे 10 टक्के भागभांडवल खरेदी करण्याची योजना जाहीर केली होती. पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी मुख्यतः जलविद्युत, सिंचन आणि पाणीपुरवठा, शहरी पायाभूत सुविधा आणि वाहतूक, धरणे, पूल, बोगदे, रस्ते, पायलिंग कामे, औद्योगिक संरचना आणि विविध प्रकारच्या अवजड स्थापत्य अभियांत्रिकी संबंधित प्रकल्पात एक्स्पर्ट मानली जाते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5,700 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patel Engineering Share Price NSE Live 19 June 2024.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x