22 November 2024 11:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

HFCL Share Price | 5G संबंधित कंपनी आणि रिलायन्सची गुंतवणूक, HFCL शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका

HFCL Share Price

HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीचे शेअर्स मंगळवारी 9.21 टक्के वाढीसह 128.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 123.15 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर दिवसभरात या कंपनीच्या शेअर्सने 128.80 रुपये ही 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. ( एचएफसीएल कंपनी अंश )

एचएफसीएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी निर्माण झाली होती, कारण भारतीय ऑप्टिकल फायबर केबल उत्पादकांवर लादलेल्या तात्पुरत्या अँटी-डंपिंग ड्युटीमधून युरोपियन कमिशन एचएफसीएल कंपनीला सूट दिली आहे. आज बुधवार दिनांक 19 जून 2024 रोजी एचएफसीएल स्टॉक 2.99 टक्के घसरणीसह 120.48 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

2024 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एचएफसीएल स्टॉक तब्बल 51 टक्के वाढला आहे. एचएफसीएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 18,437 कोटी रुपये आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे 19.41 कोटी रुपये मूल्याचे 15.41 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. या स्टॉकचा बीटा 1.9 आहे, जो एका वर्षात खूप उच्च अस्थिरता दर्शवतो.

एचएफसीएल स्टॉकने 26 ऑक्टोबर 2023 रोजी 61.52 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. एचएफसीएल स्टॉकचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक म्हणजेच RSI 67.1 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट झोनच्या जवळ पोहचला आहे. एचएफसीएल स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मुविंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे.

एचएफसीएल ही एकमेव भारतीय कंपनी आहे, जी युरोपियन बाजारपेठांमध्ये OFC च्या डंपिंगमध्ये गुंतलेली नाही. नुकताच युरोपियन कमिशनने जारी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, एचएफसीएल वगळता इतर सर्व भारतीय ऑप्टिकल फायबर केबल उत्पादकांवर तात्पुरती अँटी-डंपिंग शुल्क लावण्यात आले आहे.

ऑप्टिकल फायबर केबल्स युरोपियन उद्योग संघ Europacable ने 3 ऑक्टोबर 2023 रोजी तक्रार दाखल केली होती की, भारतीय कंपन्या ऑप्टिकल फायबर केबल युरोपमध्ये स्वस्त किमतीवर डंप करत आहे. त्यामुळे युरोपियन उद्योगाला जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. सखोल चौकशीनंतर, युरोपियन कमिशनने निवेदन जाहीर केले की, भारतीय कंपन्या विरोधात डंपिंगचा कोणताही पुरावा सापडला नाही. त्यामुळे एचएफसीएल समूहाच्या निर्यात उत्पादनावर अँटी-डंपिंग शुल्क लावले जाणार नाही.

एचएफसीएल ही कंपनी प्रामुख्याने दूरसंचार उपकरणे, ऑप्टिकल फायबर केबल्स आणि इंटेलिजेंट पॉवर सिस्टम्सचे उत्पादन करते. ही कंपनी दूरसंचार उद्योगासाठी ऑप्टिकल फायबर केबल्स, ऑप्टिकल ट्रान्सपोर्ट, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि ब्रॉडबँड उपकरण बनवते. तसेच ही कंपनी वायरलेस आणि ऑप्टिकल दूरसंचार नेटवर्क तयार करण्यासाठी विविध टेक्निकल सेवा प्रदान करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना ऑप्टिकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क, मोबाइल कम्युनिकेशन्स नेटवर्कसाठी ग्रामीण जागतिक प्रणाली, ब्रॉडबँड ऍक्सेस नेटवर्क, रेडिओ बॅकहॉल, फायबर टू द होम आणि इन-बिल्डिंग सोल्यूशन्स सेवा प्रदान करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HFCL Share Price NSE Live 19 June 2024.

हॅशटॅग्स

HFCL Share Price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x