23 November 2024 1:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस ₹16, 1 वर्षात दिला 120% परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? BUY करावा?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स मंगळवारी 1 टक्के घसरणीसह 16.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. व्होडाफोन आयडिया ही दूरसंचार कंपनी आपले कर्ज कमी करण्यासाठी विविध मार्गांनी भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

व्होडाफोन ग्रुपने इंडस टॉवर्स कंपनीमधील 2.3 अब्ज डॉलर्स मूल्याचे शेअर्स विकून भांडवल उभारणी करण्याची योजना जाहीर केली आहे. इंडस टॉवर कंपनीध्ये व्होडाफोन ग्रुपने 21.5 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आज बुधवार दिनांक 19 जून 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 2.26 टक्के घसरणीसह 16.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जागतिक ब्रोकरेज फर्म UBS ने व्होडाफोन आयडिया स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, या कंपनीचे शेअर्स 18 रुपये किमतीवर जाऊ शकतात. व्होडाफोन आयडिया कंपनीने आपली कर्ज थकबाकी परतफेड करण्यासाठी नोकिया इंडिया आणि एरिक्सन इंडिया या कंपन्यांना 2,458 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स वाटप करून भांडवल उभारणी करण्याची घोषणा केली होती.

व्होडाफोन आयडिया कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला दिलेल्या फायलींगमध्ये कळवले आहे की, संचालक मंडळाने शेअर किंमतीपेक्षा 35 टक्के अधिक किंमतीवर प्रेफरंस शेअर्सचे वाटप करण्यस मंजुरी दिली आहे. मागील पाच दिवसांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 4.28 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात व्होडाफोन आयडिया स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 120 टक्के वाढवले आहे. या काळात शेअरची किंमत सात रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 18.42 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 7.18 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,12,814.70 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 19 June 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(124)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x