RVNL Share Price | PSU शेअरने 1400% परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार, आली फायद्याची अपडेट
RVNL Share Price | आरव्हीएनएल या नवरत्न दर्जा असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 405 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला ईस्ट कोस्ट रेल्वेकडून 160.08 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरची पूर्तता पुढील 24 महिन्यांत करायची आहे. आज बुधवार दिनांक 19 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.40 टक्के घसरणीसह 390.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
आरव्हीएनएल कंपनीचा आयपीओ 5 वर्षांपूर्वी 19 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. या कंपनीचा IPO 29 मार्च 2019 ते 3 एप्रिल 2019 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता. मागील 5 वर्षांत रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1400 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. 21 जून 2019 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 26.40 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीचे शेअर्स 18 जून 2024 रोजी 405 रुपये किमतीवर पोहोचले होते.
मागील एका वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 220 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 124.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 18 डिसेंबर 2023 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 182.60 रुपये किमतीवर पोहचला होता. आता हा स्टॉक 400 रुपये किमतीच्या खाली आला आहे.
आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 424.95 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 116.15 रुपये होती. नुकताच RVNL आणि KRDCL यांच्या संयुक्त उपक्रमाला दक्षिण रेल्वे विभागाने 156,47 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. यासह आरव्हीएनएल आणि सीमेन्स कंपनीच्या कन्सोर्टियमला बंगलोर मेट्रोने 394 कोटी रुपये मूल्याचे काम दिले होते.
यापूर्वी रेल विकास निगम कंपनीला जून महिन्यात एनटीपीसी कंपनीकडून 495.14 कोटी रुपये मूल्याचे काम मिळाले होते. आणि पूर्व रेल्वेने देखील आरव्हीएनएल कंपनीला 390 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. जून 2024 मध्ये आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण हरियाणा बिजली वितरण निगम लिमिटेड कंपनीने 124.36 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती.
Disclaimer : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RVNL Share Price NSE Live 19 June 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार