23 November 2024 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा
x

IREDA Share Price | PSU शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस देईल मोठा परतावा

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स बुधवारी 1.15 टक्के घसरणीसह 173.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 47,250 कोटी रुपये आहे. 3 जून रोजी हा स्टॉक 191.9 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर 4 जून रोजी निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी या कंपनीचे शेअर्स 13 टक्के घसरणीसह 167.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत आयआरईडीए स्टॉक 167 रुपये ते 179 रुपये दरम्यान ट्रेड करत आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )

आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.26 टक्के वाढीसह 178 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आयआरईडीए स्टॉक 6 फेब्रुवारी 2024 रोजी 215 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचला होता. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किमतीच्या तुलनेत 18.13 टक्के खाली ट्रेड करत आहे. बुधवारी या कंपनीचे 42.52 कोटी रुपये मूल्याचे 24.14 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. StoxBox फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉक 185 रुपये ते 160 रुपये दरम्यानच्या रेंजबाउंडमध्ये ट्रेड करू शकतो. जर या स्टॉकने 200 रुपये किमतीवर ब्रेकआउट दिला तर शेअर अल्पावधीत 225 ते 250 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकने 165 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. आणि या स्टॉकला 186 रुपये किमतीवर रेझिस्टन्सचा सामना करावा लागत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 200 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या स्टॉकची अपेक्षित मासिक ट्रेडिंग रेंज 175 रुपये ते 200 रुपयेच्या दरम्यान असेल. या स्टॉकचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक म्हणजेच RSI 50 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही.

आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 29 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात 50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. हा स्टॉक 32 रुपये IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 56.25 टक्के वाढीसह सूचीबद्ध झाला होता. या कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 30-32 रुपये निश्चित केली होती.

एका लॉटमध्ये कंपनीने 460 शेअर्स ठेवले होते. आयआरईडीए ही मिनीरत्न-I दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे. ही कंपनी 36 वर्षांपेक्षा जास्त काळापासून नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करते. तसेच ही कंपनी ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन प्रकल्पांसाठी सक्रियपणे प्रोत्साहन, विकास आणि आर्थिक सहाय्य देखील करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 20 June 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x