4 July 2024 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअरची रेटिंग अपग्रेड, ₹28 प्राईस स्पर्श करणार HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस पाहून गुंतवणूकदार खूष TARC Share Price | मल्टिबॅगर शेअरने 1 वर्षात 243% परतावा दिला, आता तज्ज्ञांनी मोठा अंदाज व्यक्त केला NBCC Share Price | PSU शेअरसहित हे 2 शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, झटपट 27% पर्यंत कमाई होईल L&T Share Price | L&T सहित हे टॉप 5 शेअर्स शॉर्ट-टर्म मध्ये मोठा परतावा देणार, कमाईची मोठी संधी Penny Stocks | शेअर प्राईस 95 पैसे! चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स मालामाल करतील, रोज अप्पर सर्किट हिट IREDA Share Price | IREDA शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

Bondada Share Price | पटापट परतावा देणारा शेअर, 10 महिन्यात दिला 1610% परतावा, खरेदी करणार?

Bondada Share Price

Bondada Share Price | बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जोरदार नफा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीला भारती एअरटेल कंपनीकडून नवीन ऑर्डर मिळाली आहे. 18 जून रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2558.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी अंश )

आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5.527.10 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 2,820.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2,558.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 142.50 रुपये होती. नुकताच बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीला भारती एअरटेल कंपनीने 2.05 कोटी रुपये मूल्याची नवीन वर्क ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीला 60 किलो वजनाचा आणि 6 मीटर उंचीचा हॉट डीप गॅलव्हनाइज्ड GI पोल पुरवायचा आहे. जानेवारी 2024 पर्यंत या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 1600 कोटी रुपये होता.

बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीला नुकताच NLC India Limited कंपनीकडून खवरा गुजरात येथे 600MW ग्रिड कनेक्टेड सोलर पॉवर प्रकल्पाच्या उभारणीचे काम मिळाले आहे. या वर्क ऑर्डरचे एकूण मुल्य 9,39,39,76,731 रुपये आहे. 2023-24 मध्ये बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 16.8 कोटी रुपयेवरून वाढून 44.72 कोटी रुपयेवर गेला होता. कंपनीचा महसूल मागील आर्थिक वर्षत 371 कोटी रुप येवरून 801 कोटी रुपयेवर गेला आहे.

मागील एका महिन्यात बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 536 टक्के वाढवले आहे. 2024 या वर्षात बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 513 टक्के वाढला आहे. मागील 10 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1610 टक्के वाढवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bondada Share Price NSE Live 20 June 2024.

हॅशटॅग्स

Bondada Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x