23 November 2024 9:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअरसाठी 'BUY' रेटिंग, ICICI सिक्युरिटीज फर्मने सांगितली पुढची टार्गेट प्राईस

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. हा कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तेजीत वाढत आहेत. आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 51.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारी झालेल्या ब्लॉक डीलमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे 3.7 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.50 टक्के वाढीसह 52.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. गुरुवारी सुझलॉन कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या ब्लॉक डीलचे व्यवहार मूल्य 179 कोटी रुपये होते. मागील तीन महिन्यापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी निर्माण झाली आहे. मे महिन्यात सुझलॉन एनर्जी स्टॉक 15 टक्के वाढला होता. एप्रिलमध्ये हा स्टॉक 3 टक्के आणि जूनमध्ये 6.5 टक्के वाढला होता. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये शेअरमध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळाली होती.

2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील अनेक दिग्गज तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 60 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केल्यावर कंपनीच्या व्यवस्थापनाला लाभांश देणार की नाही असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर कंपनीचे CFO हिमांशू मोदी यांनी उत्तर दिले की, सुझलॉन एनर्जी कंपनीकडे आर्थिक वर्ष 2024-2025 साठी अनेक योजना आहेत. या काळात कंपनी आपल्या व्यवसाय करण्यावर भर देण्यावर विचार करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 21 June 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x