5 October 2024 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Special FD | SBI बँकेच्या 'या' जबरदस्त स्कीमला मुदतवाढ, बँकेत गर्दी, मोठ्या व्याजदरा सह मिळेल मोठा परतावा - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअरने दिला 600% परतावा, पुढे तेजी टिकून राहील का, तज्ज्ञांनी काय म्हटलं पहा - Marathi News Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात होणार रीयुनियन, पुन्हा एकदा पाहायला मिळणार अरबाज आणि निक्कीची केमिस्ट्री Loan Alert | नोकरदारांनो, 'या' चुकांमुळे कर्जाचा डोंगर डोक्यावरून कधीही उतरणार नाही, या गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News Smart Investment | गृहिणींनो आता डब्यात नाही तर बँकेत पैसे जमा करा, 500 रुपयांची SIP बनवेल लखपती - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सहित हे 5 शेअर्स करतील मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News SBI Mutual Fund | पगारदारांनो, शेअर्स नको तर हा आहे मल्टिबॅगर SBI म्युच्युअल फंड, देतोय 284% पर्यंत परतावा - Marathi News
x

Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, यापूर्वी 1000% परतावा दिला

Bonus Share News

Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका कंपनीबद्दल माहिती देणार आहोत जी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ( जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनी अंश )

या कंपनीचे नाव आहे, जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स. या कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअरधारकांना एका शेअरवर एक बोनस शेअर मोफत देण्याची घोषणा केली आहे. शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स स्टॉक 3.37 टक्के वाढीसह 267 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 41 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 375 टक्के वाढली आहे. मागील तीन वर्षांत जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1000 टक्के वाढवले आहेत. बोनस शेअरची बातमी जाहीर होताच जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स स्टॉक 5 टक्क्यांनी वाढला होता.

जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीचा नफा 16.1 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीने 10 कोटी रुपये नफा कमावला होता. 2022-23 च्या मार्च तिमाहीत जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीने 268 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मार्च 2024 तिमाहीत कंपनीने 295 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स ही कंपनी जीपीटी ग्रुपचा भाग आहे. ही कंपनी मुख्यतः पायाभूत सुविधां क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीची स्थापना 1980 साली झाली होती. ही कंपनी भारतीय रेल्वेसाठी देखील काम करते. रेल्वेसाठी या कंपनीने स्लीपर, पूल आणि आरओबी बनवण्याचे काम केले आहे. या कंपनीला परदेशातून देखील अनेक ऑर्डर मिळत असतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Share News on GPT Infraprojects Ltd NSE Live 22 June 2024.

हॅशटॅग्स

Bonus Share News(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x