6 July 2024 5:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Notice | पगारदारांनो! ITR मध्ये या 11 पैकी कोणतीही एक चुक केल्यास इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Numerology Horoscope | 07 जुलै 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल SJVN Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर खरेदी करा, ब्रेकआउटचे संकेत, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई होईल Home Loan Alert | 90% लोकांना माहिती नाही, गृहकर्ज घेताना 'या' 5 गोष्टींचा वापर करा, लाखोंची बचत होईल IRB Infra Share Price | IRB इंफ्रा स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक धमाका करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सह रॉकेट स्पीडने परतावा देणारे 10 पेनी शेअर्स, लॉटरी लागणार अनेकांना Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ग्राहकांच्या FD ठेवी वाढल्या, पण अधिक फायदा नेमका कुठे झाला?
x

IRB Infra Share Price | 66 रुपयाचा शेअर खरेदी करा, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मिळणार मोठा परतावा

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 2024 या वर्षात 60 टक्क्यांनी वाढला आहे. पुढील काळात हा स्टॉक मजबूत वाढू शकतो. तज्ञांच्या मते, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 28 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )

सेंट्रम ब्रोकिंग फर्मच्या मते, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 75 रुपये किमतीवर जाऊ शकतो. पुढील 6 महिन्यांत या स्टॉकमध्ये 85 रुपये किमतीवर जाण्याची क्षमता आहे. शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 1.01 टक्के वाढीसह 66.31 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

तज्ञांच्या मते, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकने 63 रुपये किमतीवर सपोर्ट निर्माण केला आहे. 2021 संपूर्ण वर्षात आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 91 टक्के वाढला होता. 2024 या वर्षात स्टॉकने आतापर्यंत 60 टक्के वाढ नोंदवली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 66.09 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दिवसाअखेर हा शेअर 1.50 टक्के वाढीसह 66.68 रुपये या दिवसभराच्या इंट्रा डे उच्चांक किमतीवर पोहोचला होता. या कंपनीचे बाजार भांडवल 40000 कोटी रुपये आहे.

टेक्निकल चार्टवर आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 65.44 रुपये या आपल्या 100 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेज किंमत पातळीच्या वर मात्र 68.1 रुपये या 50 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेज किंमत पातळीच्या खाली ट्रेड करत आहेत. नुकताच प्रवर्तकांनी आपला हिस्सा ब्लॉक डीलद्वारे विकल्यानंतर आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स चर्चेत आले आहेत. स्पॅनिश इन्फ्रा कंपनी फेरोव्हियलने ब्लॉक डीलद्वारे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकमधील 1920 कोटी रुपये मूल्याचे भागभांडवल विकले आहेत. मार्च 2024 तिमाहीपर्यंत फेरोव्हियलने कंपनीने सिंट्रा या उपकंपनीच्या माध्यमातून आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 24.86 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infra Share Price NSE Live 22 June 2024.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x