22 November 2024 10:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Den Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरची किंमत 55 रुपये, खरेदीची संधी सोडू नका, दिग्गजांनी केली खरेदी

Den Share Price

Den Share Price | मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या डीईएन नेटवर्क्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पहायला मिळाला आहे. जुलै 2023 मध्ये हा स्टॉक 32.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. तर जानेवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 69.40 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( डीईएन नेटवर्क्स कंपनी अंश )

शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी डीईएन नेटवर्क्स स्टॉक 2.83 टक्के घसरणीसह 55.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

डीईएन नेटवर्क्स कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 74.90 टक्के भागभांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 25 टक्के भागभांडवल धारण केले आहे. मुकेश अंबानींच्या मालकीची रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी डीईएन नेटवर्क्समध्ये भागीदार आहे. या कंपनीच्या प्रवर्तक गटात वंदना मनचंदा, कविता मनचंदा, समीर आणि संजीव मनचंदा सामील आहेत. त्यांनी या कंपनीचे 2,17,52,620 शेअर्स म्हणजेच जवळपास 4.56 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

डीईएन नेटवर्क्स कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये Reliance Industries Investments & Holdings Ltd, Reliance Ventures Ltd आणि Network 18 Media & Investments Ltd सामील आहेत. यासह जिओ टेलिव्हिजन डिस्ट्रिब्युशन होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड, जिओ फ्यूचरिस्टिक डिजिटल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जिओ डिजिटल डिस्ट्रीब्युशन होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड यां कंपन्यांनी देखील डेन नेटवर्क्स कंपनीचे शेअर्स धारण केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Den Share Price NSE Live 22 June 2024.

हॅशटॅग्स

DEN Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x