23 November 2024 4:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Brand Rahul Gandhi | जो मै बोलता हूं, वो मैं करता हूं! काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी

Farmers Waived Off

Brand Rahul Gandhi | राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलेलं वचन पाळलं आहे. काँग्रेसची सत्ता आलेल्या एका राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या लक्षात घेऊन तेलंगणातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सांगितले की, दोन लाख रुपयांची कर्जमाफी लवकरच लागू केली जाईल.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत तेलंगणातील काँग्रेस सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. यावेळी सीएम रेवंत रेड्डी म्हणाले की, 2018 ते 2023 दरम्यान 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना एकरकमी माफ केले जाईल.

राज्यातील शेतकऱ्यांनी १२ डिसेंबर २०१८ ते ९ डिसेंबर २०२३ या पाच वर्षांसाठी घेतलेले दोन लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी दिली. पात्रतेच्या अटींसह कर्जमाफीचा तपशील लवकरच शासन आदेशात (जीओ) जाहीर केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर किती आर्थिक बोजा पडणार
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे तेलंगणा सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडणार आहे. मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले की, कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे 31,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मागील बीआरएस सरकारने एक लाख रुपयांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी न करून शेतकरी आणि शेती अडचणीत आणली होती, असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन सरकार पूर्ण करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

काँग्रेसने पूर्ण केले कर्जमाफीचे आश्वासन
काँग्रेस पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी 6 मे 2022 रोजी वारंगलमध्ये तेलंगणातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आज राज्यातील काँग्रेस सरकारने आपले आश्वासन पूर्ण केले आहे.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बीआरएसचा दारुण पराभव करून सत्ता मिळवली होती आणि ए. रेवंत रेड्डी यांना मुख्यमंत्री केले होते. आता काँग्रेसप्रणीत राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे.

यापूर्वी काँग्रेस प्रणित झारखंड सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या लक्षात घेऊन कर्जमाफीची घोषणा केली होती. मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी सांगितले होते की, त्यांचे आघाडी सरकार शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करेल. यामुळे मोफत विजेचा कोटा २०० युनिटपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी अनेक बँकांना प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. सीएम चंपई सोरेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2020 पर्यंत 50 हजार ते 2 लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज वन टाइम सेटलमेंटद्वारे माफ केले जाईल.

News Title : Farmers Waived Off in Telangana State check details 22 June 2024.

हॅशटॅग्स

#Farmers Waived Off(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x