19 September 2024 10:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

IREDA Share Price | PSU शेअर तुफान तेजीच्या दिशेने, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, ब्रोकरेज फर्मचा रिपोर्ट काय?

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 5.83 टक्के वाढीसह 187.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आयआरईडीए कंपनीचे एकूण बाजार भांडवल 50,489 कोटी रुपये आहे. 2024 या वर्षात आतपर्यंत आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना 79 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 42 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )

नुकताच केअर रेटिंग्स लिमिटेडने आयआरईडीए कंपनीच्या बॉन्ड्स आणि एनसीडीचे रेटिंग CARE AA+ वर अपग्रेड केले आहे. त्यामुळे शुक्रवारी इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचे शेअर्स एका दिवसात 6 टक्के वाढले होते. यासह आयआरईडीए स्टॉक एफटीएसई ऑल वर्ल्ड इंडेक्समध्ये सामील करण्यात आला आहे. आज सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 2.20 टक्के वाढीसह 191.67 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आयआरईडीए स्टॉकचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक म्हणजेच RSI 49.6 अंकावर आहे. यावरून समजते की हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. 29 नोव्हेंबर 2023 रोजी आयआरईडीए स्टॉक 49.99 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. या मूल्यावरून हा स्टॉक 275 टक्के मजबूत झाला आहे.

IIFL अल्टरनेट रिसर्च फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये 57 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूकीचे आगमन होऊ शकते. FTSE ऍडजस्टमेंट लागू झाल्यावर हा स्टॉक अवघ्या 30 मिनिटांच्या ट्रेडमध्ये 7.5 टक्के वाढला होता. आयआरईडीए ही एक मिनी रत्न-I दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे. ही कंपनी भारत सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय अंतर्गत व्यवसाय करते. ही कंपनी नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्प, तसेच ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन प्रकल्पांसाठी सक्रियपणे प्रोत्साहन, विकास आणि आर्थिक सहाय्य करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 24 June 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x