24 November 2024 9:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Rajoo Engineers Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, मिळतील फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 595% परतावा

Rajoo Engineers Share Price

Rajoo Engineers Share Price | राजू इंजिनियर्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. आता ही कंपनी बोनस शेअर्स आणि लाभांश वाटपासाठी चर्चेत आली आहे. राजू इंजिनियर्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 28 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ( राजू इंजिनियर्स कंपनी अंश )

राजू इंजिनियर्स लिमिटेड कंपनीचे संचालक बैठकीत बोनस शेअर्स आणि अंतिम लाभांश वाटप करण्यावर चर्चा करू शकतात. यापूर्वी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 24 जून रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर कंपनीने बैठक पुढे ढकलल्याची बातमी सेबीला कळवली होती. आज सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी राजू इंजिनियर्स स्टॉक 0.55 टक्के घसरणीसह 305.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

राजू इंजिनियर्स कंपनीने 2002 मध्ये पहिल्यांदा लाभांश वाटप केला होता. 28 ऑगस्ट 2002 रोजी या कंपनीचे शेअर्स एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून ट्रेड करत होते. या कंपनीने 15 सप्टेंबर 2023 रोजी देखील गुंतवणुकदारांना लाभांश वाटप केला होता. 17 सप्टेंबर 2009 रोजी राजू इंजिनियर्स कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यात विभाजित केले होते. या कंपनीने आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप केलेले नाही. राजू इंजिनियर्स लिमिटेड कंपनीने जानेवारीत बायबॅक लाँच केला होता, त्यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 31 जानेवारी 2024 हा दिवस निश्चित केला होता.

मागील एका वर्षभरात राजू इंजिनियर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 595 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या स्टॉकची किंमत 33.30 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.45 टक्क्यांच्या वाढीसह 307.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 310 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 41 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rajoo Engineers Share Price NSE Live 24 June 2024.

हॅशटॅग्स

Rajoo Engineers Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x