22 November 2024 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर आणि अदानी ग्रीन एनर्जी शेअर्समध्ये सुसाट तेजी येणार, आली सकारात्मक अपडेट

Tata Power Share Price

Tata Power Share Price | केंद्रीय पातळीवर राजस्थान आणि कर्नाटकमधील अक्षय ऊर्जा प्रकल्पातून निर्माण झालेली वीज देशात पुरवण्याची योजना आखली जात आहे. भारत सरकारने 13600 कोटी रुपये मूल्याच्या वीज पारेषण योजनेला मंजुरी दिली आहे. भारत सरकार अक्षय ऊर्जेच्या वापरत वाढ व्हावी यासाठी नवीन योजनेवर काम करत आहे. याअंतर्गत अक्षय ऊर्जा प्रकल्पांतून निर्माण होणारी वीज देशभरात पुरवली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने 13,595 कोटी रुपये मूल्याची नवीन पारेषण योजना मंजूर केली आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )

राजस्थानमधील अक्षय ऊर्जा केंद्रातून 4.5 GW वीज निर्मिती होते. राजस्थानमध्ये हे उत्पादन फतेहगड, बारमेर आणि नागौर जिल्ह्यात केले जाते. राजस्थानच्या प्लांट्समधून उत्पादन होणारी वीज राष्ट्रीय ग्रीडशी जोडण्यासाठी आणखी 2 वर्षे लागू शकतात. यासाठी 12241 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. त्याच वेळी कर्नाटकातील कोपल आणि गंडक प्लांटमधून 4.5 GW वीज निर्मिती केली जाते. ही वीज नॅशनल ग्रीडशीही जोडण्यासाठी 1354 रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. या दोन्ही भागात अदानी ग्रीन, टाटा पॉवर यांचे प्लांट आहेत. याठिकाणी उत्पादन होणारी वीज नॅशनल ग्रीडशी जोडल्यास या कंपन्यांना मजबूत फायदा होऊ शकतो. या कंपन्या अधिक स्पर्धात्मक बोलीद्वारे वीज विकून चांगली किंमत मिळवू शकतील.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.48 टक्क्यांच्या वाढीसह 1790 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या स्टॉकची दैनिक उच्चांक किंमत पातळी 1,791 रुपये होती. तर दैनिक नीचांक किंमत पातळी 1,771 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 283,407 आहे. 2024 या वर्षात हा स्टॉक 12 टक्के वाढला आहे.

मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 86 टक्के आणि 3 वर्षात 57 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.96 टक्के घसरणीसह 1,794.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा पॉवर स्टॉक कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.05 टक्क्यांच्या घसरणीसह 438 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 12.14 टक्के वाढली आहे. तर 1 वर्षात हा स्टॉक 100 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 268 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के घसरणीसह 432.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 25 June 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(130)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x