24 November 2024 6:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट देणार! रॉकेट स्पीडने मिळणार परतावा, कमाईची मोठी संधी

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह 176.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 200 रुपयेच्या पार जाऊ शकतो. सध्या 200 रुपये ही किंमत पातळी शेअरची ब्रेकआऊट लेव्हल म्हणून काम करत आहे. जर हा स्टॉक 200 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर 235 रुपये किंमत स्पर्श करेल. ( आयआरएफसी कंपनी अंश )

आज बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.074 टक्के घसरणीसह 175.48 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सध्या आयआरएफसी स्टॉक 200 रुपये या किमतीच्या तुलनेत 12 टक्के सवलतीवर ट्रेड करत आहे. लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले त्या 3 जून रोजी आयआरएफसी स्टॉक आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचला होता. मात्र 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तेव्हा हा स्टॉक 164 रुपये किमतीवर आला होता.

सध्या शेअर बाजारातील तज्ञांनी आयआरएफसी स्टॉक 159 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकवर तज्ञांनी 200 रुपये ही पहिली टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. या कंपनीचा आयपीओ 2021 साली 26 रुपये किमतीवर आला होता. 2023 मध्ये या कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त कामगिरी केली होती. या कालावधीत शेअर्सची किंमत जवळजवळ तिप्पट वाढली होती. आयआरएफसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.31 लाख कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 26 June 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x