4 July 2024 8:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअरची रेटिंग अपग्रेड, ₹28 प्राईस स्पर्श करणार HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस पाहून गुंतवणूकदार खूष TARC Share Price | मल्टिबॅगर शेअरने 1 वर्षात 243% परतावा दिला, आता तज्ज्ञांनी मोठा अंदाज व्यक्त केला NBCC Share Price | PSU शेअरसहित हे 2 शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, झटपट 27% पर्यंत कमाई होईल L&T Share Price | L&T सहित हे टॉप 5 शेअर्स शॉर्ट-टर्म मध्ये मोठा परतावा देणार, कमाईची मोठी संधी Penny Stocks | शेअर प्राईस 95 पैसे! चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स मालामाल करतील, रोज अप्पर सर्किट हिट IREDA Share Price | IREDA शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

Adani Wilmar Share Price | तज्ज्ञांकडून अदानी विल्मर शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राइस पाहून खूष होऊन जाल

Adani Wilmar Share Price

Adani Wilmar Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. आज मात्र हा स्टॉक जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्म Investec ने अदानी विल्मर या FMCG कंपनीचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. ( अदानी विल्मर कंपनी अंश )

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी विल्मर स्टॉक 336 रुपये किमतीवर ओपन झाला होता. तर दिवसभरात या शेअरने 337.90 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. दरम्यान एका दिवसात या कंपनीचे 4.53 लाख इक्विटी शेअर्स ट्रेड झाले होते. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी अदानी विल्मर स्टॉक 0.54 टक्के घसरणीसह 333.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर अदानी विल्मर स्टॉक बुधवारी तेजीत आला होता. अदानी विल्मर स्टॉक आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200-दिवसांच्या मुविंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. Investec फर्मच्या तज्ञांनी अदानी विल्मर स्टॉक दीर्घ मुदतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आर्थिक वर्ष 2024- 26 या कालावधीत कंपनीला खाद्यतेलांमधून मिळणारा महसूल 7 टक्के CAGR ने वाढू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. व्यवसायातील अस्थिरता आणि कमी मार्जिन अदानी विल्मर स्टॉकसाठी संभाव्य चढ-उतार निर्माण करू शकतात.

ब्रोकरेज फर्मने अदानी विल्मर स्टॉकवर 374 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये या कंपनीचा IPO लॉन्च करण्यात आला होता. मागील एका वर्षात अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्सची किंमत 17 टक्के घसरली आहे. तर मागील दोन वर्षांत हा स्टॉक 42 टक्क्यांनी खाली आला आहे. अदानी विल्मर कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये स्वयंपाकाचे तेल, तांदूळ, डाळी, मैदा, साखर, सोयाबीन वस्तू सामील आहेत. आर्थिक वर्ष 2024 च्या मार्च तिमाहीत अदानी विल्मर कंपनीने 67 टक्के वाढीसह 156.75 कोटी रुपये नफा कमावला होता.

मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 93.61 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2024 तिमाहीत अदानी विल्मर कंपनीने 13342.26 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 14,185.68 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अदानी विल्मर कंपनीने 51.555.24 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर 2022-23 मध्ये या कंपनीने 59148.32 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या महसूल संकलनात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Wilmar Share Price NSE Live 27 June 2024.

हॅशटॅग्स

#Adani Wilmar Share Price(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x