22 November 2024 7:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉकवर काय परिणाम होणार?

JP Power Share Price

JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स बुधवारी 1.50 टक्के घसरणीसह 19.69 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवसभराच्या व्यवहारात हा स्टॉक 20.20 रुपये किमतीवर पोहचला होता. 12 फेब्रुवारी 2024 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स स्टॉक 23.99 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. तर जुलै 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 5.92 रूपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. ( जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनी अंश )

2007 मध्ये जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 135 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के वाढीसह 19.81 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 24 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 76 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

जयप्रकाश असोसिएट्स ही कंपनी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या प्रवर्तक गटात सामील आहे. या प्रवर्तक कंपनीने जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे 1,64,48,30,118 शेअर्स धारण केले आहेत. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या सार्वजनिक शेअरधारकांमध्ये UCO, ICICI बँक, सेंट्रल बैंक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक यासारख्या मोठ्या बँका सामील आहेत.

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे 9,44,80,125 शेअर्स म्हणजेच एकूण 1.38 टक्के भागभांडवल धारण केले आहे. नुकताच जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीने सुरेन जैन यांना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून पुनर्नियुक्त केले आहे. त्यांचा कार्यकाळ 12 जानेवारी 2025 पासून पुढील पाच वर्षांसाठी असेल.

जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीने सुनील कुमार शर्मा यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी कार्यकारी संचालक म्हणून वाढ केली आहे. तसेच दिनेश कुमार लिखी यांना 6 ऑगस्ट 2024 पासून पुढील तीन वर्षांसाठी गैर-कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून पुनर्नियुक्त केले आहे. प्रवीण कुमार सिंग यांना 22 ऑगस्ट 2024 पासून पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारी संचालक म्हणून पुनर्नियुक्त करण्यात आले आहे. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड ही कंपनी जेपी ग्रुपचा भाग आहे, जी भारतात ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Power Share Price NSE Live 28 June 2024.

हॅशटॅग्स

JP Power Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x